पोलीस हेल्पलाईनमुळे वाचले ३.७३ कोटी, सायबर गुन्हेगारांची दहशत वाढली

By वासुदेव.पागी | Published: August 3, 2024 04:04 PM2024-08-03T16:04:49+5:302024-08-03T16:05:10+5:30

सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढा देताना तो सर्व आघाड्यांवर द्यावा लागतो

3.73 crore saved due to police helpline, fear of cyber criminals increased | पोलीस हेल्पलाईनमुळे वाचले ३.७३ कोटी, सायबर गुन्हेगारांची दहशत वाढली

पोलीस हेल्पलाईनमुळे वाचले ३.७३ कोटी, सायबर गुन्हेगारांची दहशत वाढली

पणजी - सायबर गुन्हेगारांपासून बचाव करणम्यासाठी पोलीसांनी जारी केलल्या १९३० या हेल्पलाईमुळे लोकांचे एकूण ३.७३ कोटी रुपये वाचविण्यात यश मिळाल्याची माहिती सायबर विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. 

सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढा देताना तो सर्व आघाड्यांवर द्यावा लागतो. एका बाजूने सायबर गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचा तपास करणे आणि सायबर गुन्हेगारी होऊ नये यासाठी लोकात जागृती करणे तसेच त्यासाठी लोकांना आपत्कालीन सहाय्यतेसाठी हेल्पलाईन देणे अशी कामे सायबर विभागाकडून केली जात आहेत. १०३० या क्रमांकावर संपर्क करून कुणीही सायबर गुन्हे संबंधी मदत मागू शकतात. या हेल्पलाईनमुळे लोकांची फार मोठी मदत झाली असल्याचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी सांगितले. हेल्पलाईनमुळे सायबर गुन्हेगारांनी फसवून लुटलेले  ३.७३ कोटी रुपये वाचविण्यास यश मिळाले आहे. यावर्षी २.७१ कोटी रुपये गोठविण्यात आले तर ३.७३ कोटी रुपये त्यापूर्वी गोठविण्यात आले होते. गोठविण्यात आलेली एकूण रक्कम ६.७३ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

गोठविण्यात आलेली रक्कम पीडीतांना परत करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहितीही गुप्ता यांच्याकडून देण्यात आली. ही प्रक्रिया अधिक सूलभ करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. 

३ कारणांमुळे बनतात सायबर गुन्हेगारांचे शिकार 

लोभ

सायबर गुन्हेगार लोकांच्या लवकर पैसे कमावण्याच्या लोभी वृत्तीचा गैरफायदा घेतात.  गुंतवणुकीवरील भरमसाट  परतावा, न काढलेली लॉटरी जिंकणे आणि कुणी तरी अनोळखी माणसाकडून आपल्याला भेटवस्तु पाठविली जाऊ शकते यावर विश्वास ठेवणे यामुळे लाखो रुपये गमावून बसण्याचे प्रकार घडले आहेत. 

पटकन विश्वास ठेवणे

सायबर गुन्हेगार अनेकदा पीडिताचा विश्वास लवकर मिळवून यशस्वी होतात. त्यासाठी तोतयागिरी ते करतात. स्वातःला  कायदेशीर कंपनीचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी किंवा विश्वासू मित्र असल्याचे वगैरे सांगतात आणि लोक पटकन विश्वास ठेवतात.

अज्ञानामुळे

बरेच लोक सामान्य सायबर घोटाळे, सायबर सुरक्षा उपायांचे महत्त्व जाणत नाहीत. सायबर गुन्हेगारांच्य भूलथापा ओळखत नाहीत.  अज्ञानामुळे असुरक्षित इंटरनेट सर्फींग केले जाते. अनोळखी लिंक्स क्लिक करणे आणि इथर बेजबाबदार कृती होतात आणि त्यांची गोपनीय माहिती हरवून बसतात.

Web Title: 3.73 crore saved due to police helpline, fear of cyber criminals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.