३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ; ०९ नोव्हेंबरपर्यंत चालणार

By समीर नाईक | Published: October 18, 2023 05:29 PM2023-10-18T17:29:18+5:302023-10-18T17:30:42+5:30

सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

37th national sports tournament starts tomorrow in goa | ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ; ०९ नोव्हेंबरपर्यंत चालणार

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ; ०९ नोव्हेंबरपर्यंत चालणार

समीर नाईक, पणजी:  राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे राज्यात होत असल्याने राज्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. ९ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.  
गुरुवार १९ रोजी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे बॅडमिंटन या क्रीडा प्रकारापासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यांनतर नेटबॉल, जिमनॅस्टिक, बास्केटबॉल, यासारखे क्रीडा प्रकार होणार आहे. 

२६ रोजी पंतप्रधानाच्याहस्ते अधिकृत उद्घाटन 

१९ पासून स्पर्धा सुरू होत असली तरी सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे भव्य स्वरुपात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार, इतर मंत्री, आमदार व देशातील प्रसिद्ध क्रीडापटू उपस्थित राहणार आहे. 

पोलिसांच्या रजा रद्द, प्रशिक्षणार्थी पोलिसही असणार बंदोबस्तात 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच स्पर्धा संपेपर्यंत त्यांना रजाही देण्यात येणार नाही, याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी काढला आहे. तसेच स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलना बोलावण्यात आले आहे. याशिवाय केंद्राकडून अतिरिक्त कंपनी सेवेसाठी मागविण्यात आले आहे.

हजार पेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडूंचा सहभाग 

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद राज्याला मिळाले असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्याला थेट प्रवेश मिळाला आहे, पण काही क्रीडा प्रकारासाठी राज्यात संघटना नसल्याने सुमारे ६-७ क्रीडा प्रकार वगळता सर्व क्रीडा प्रकारात गोव्याचे संघ सहभाग घेणार आहे. यातून सुमारे एक हजारपेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडू सहभागी होत आहे.

७ ते ८ हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना पाहता यावी यासाठी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी केले होते, यानुसार सुरुवातीच्या काळात सुमारे ४ हजार विद्यार्थी स्पर्धा दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, पण जशी जशी स्पर्धा जवळ येत आहे, तसे तसे ही संख्या वाढू लागली असून आता जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 37th national sports tournament starts tomorrow in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा