६ महिन्यात सरकारी पाहुण्यांवर गोवा सरकारकडून ३.८० कोटी खर्च
By वासुदेव.पागी | Published: July 22, 2023 06:36 PM2023-07-22T18:36:47+5:302023-07-22T18:37:03+5:30
सरकारी पाहुणे बनून येणाऱ्यांचा राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च हा सरकारकडून केला जातो.
पणजी : सरकारी पाहुणे बनून येणाऱ्यांचा राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च हा सरकारकडून केला जातो. या वर्षी जानेवारी ते जून या ६ महिन्यात पाहुण्यांसाठी गोवा सरकारकडून ३.८० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती शिष्टाचार खात्याकडून देण्यात आली आहे. सरकारी पाहुण्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा तसेच त्यांच्या जेवणखाण्याचा आणि प्रवासाचा खर्च हा सरकारकडून केला जातो.
शासकीय कामे करताना येणारा खाण्यापीण्याचा खर्च हा सरकारी तिजोरीतून केला जातो. मग तो आमदार व मंत्र्यांसाठी असो किंवा खास निमंत्रितांसाठी असो. गोव्यात सरकारी जेवणाच्या बाबतीत दुपारचे जेवण हे स्वस्त तर रात्रीचे खूप महाग असते असे शिष्टाचार खात्याकडून सादर केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभेत आमदार युरी आलेमाव आणि विरेश बोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिष्टाचार खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या उत्तरात निमंत्रितांचा सरकारी कामांनिमित्त झालेल्या मेजवान्याच्या खर्चाचा तपशील सादर केला.