वेर्णा महामार्गावरील अपघातात ३९ वर्षीय महीलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:12 PM2020-12-10T19:12:31+5:302020-12-10T19:12:57+5:30

वास्को: गुरूवारी (दि १०) पहाटे ४ च्या सुमारास वेर्णा महामार्गावरून चारचाकीने जाताना महामार्गाच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रेलरट्रकला जबर धडक ...

A 39-year-old woman died in an accident on the Verna Highway | वेर्णा महामार्गावरील अपघातात ३९ वर्षीय महीलेचा मृत्यू

वेर्णा महामार्गावरील अपघातात ३९ वर्षीय महीलेचा मृत्यू

Next

वास्को: गुरूवारी (दि १०) पहाटे ४ च्या सुमारास वेर्णा महामार्गावरून चारचाकीने जाताना महामार्गाच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रेलरट्रकला जबर धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात ३९ वर्षीय दिक्क्षा दामोदर नाईक या महीलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी काकोडा, कुडचडे येथे राहणाऱ्या दिक्क्षा यांच्या चारचाकीत अन्य दोघेजण असून अपघातात तेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात दाखल केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली.

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरूश्कर यांनी दिलेल्या माहीतीनुसार दिक्क्षा ‘आल्तो ८००’ चारचाकीने (क्र: जीए ०५ एफ ०८७२) पणजीहून मडगावच्या दिशेने जाताना हा अपघात घडला. वेर्णा औद्योगिक वसाहतीबाहेरील महामार्ग पार करून पुढे पोचल्यानंतर दिक्क्षाचा अचानक ‘स्टीअरींग’ वरील ताबा सुटून ‘जेसीबी’ शोरुमच्या बाहेरील मार्गावर बाजूला पार्क करून ठेवलेल्या ट्रेलरट्रक (क्र: जीए ०४ टी ७३९९) वर तिच्या चारचाकीने जबर धडक दिली. या अपघातात चारचाकी चालवणारी दिक्क्षा जागीच मरण पोचल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरूश्कर यांनी दिली. या अपघातावेळी त्या चारचाकीत असलेले अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून मयत दिक्क्षा हीच्या मृतदेहावर शवचिकित्सा करून तिचा मृतदेह पतीच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुरूवारी अपघातात मरण पोचलेल्या दिक्क्षा हीला एक मुलगा असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक सिमेपुरूश्कर यांच्याकडून प्राप्त झाली. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करित आहेत.

Web Title: A 39-year-old woman died in an accident on the Verna Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.