दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून ४८ लाख ४७ हजारांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:45 PM2019-05-21T19:45:14+5:302019-05-21T19:45:35+5:30

गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून मंगळवारी (दि.२१) कस्टम अधिकाऱ्यांनी विदेशातून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने आणलेले १ किलो ६३० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले.

48 lakh 47 thousand smuggled gold seized from Daboli airport | दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून ४८ लाख ४७ हजारांचे तस्करीचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून ४८ लाख ४७ हजारांचे तस्करीचे सोने जप्त

Next

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून मंगळवारी (दि.२१) कस्टम अधिकाऱ्यांनी विदेशातून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने आणलेले १ किलो ६३० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेले तस्करीचे सोने ४८ लाख ४७ हजार ७३४ रुपयांचे असून, कस्टम अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ते विमानतळाबाहेर नेण्यासाठी त्याने ते कमरेवर बांधलेल्या बेल्ट तसेच पायातील बुटात लपवून आणल्याचे तपासणीवेळी कस्टम अधिका-यांच्या समोर उघडकीस आले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सदर कारवाई करण्यात आली. मस्कत राष्ट्रातून दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या ‘एअर ओमान’ विमानातून एक प्रवासी तस्करीचे सोने घेऊन येत असल्याची पूर्व माहिती कस्टम अधिका-यांना मिळताच त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. विमान येथे पोचल्यानंतर प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली असता कस्टम अधिका-यांना एका प्रवाशाच्या हालचालीवरून संशय आल्याने त्याला बाजूला घेऊन त्याची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत कस्टम अधिका-यांना त्या प्रवाशाने आपल्या कमरेत घातलेल्या बेल्टमध्ये तसेच पायातील बूटमध्ये पेस्ट पद्धतीने सोने लपवून आणल्याचे स्पष्ट होताच सदर सोने प्रथम ताब्यात घेण्यात आले.

ह्या सोन्याचे वजन केले असता ते १ किलो ६३० ग्राम असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी कारवाई करून जप्त केलेले सदर सोने ४८ लाख ४७ हजार ७३४ रुपयांचे असल्याची माहिती कस्टम अधिका-यांनी दिली. त्या प्रवाशाने सदर तस्करीचे सोने कुठून आणले होते व येथून ते कुठे नेण्यात येणार होते याबाबत कस्टम अधिकारी तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन. जी. पटेल, सहायक कमिश्नर दीपक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

दीड महिन्यात दाबोळी विमानतळावर ६० लाख ५८ हजारांचे तस्करीचे सोने जप्त
१ एप्रिल २०१९ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी ६० लाख ५८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती विभागाच्या अधिका-यांनी उघड केली. मंगळवारी (दि.२१) कस्टम विभागाने केलेल्या तस्करीच्या सोन्या विरुद्धची कारवाई दाबोळी विमानतळावरील ह्या आर्थिक वर्षातील अजूनपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी कळविले.

Web Title: 48 lakh 47 thousand smuggled gold seized from Daboli airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.