५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 10:35 AM2024-03-15T10:35:08+5:302024-03-15T10:36:00+5:30
कुडचडे येथील व्यापारी संमेलनाला प्रतिसाद.
लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : नाईन्टी टेन इमारत प्रकल्पाचा ५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. रवींद्र भवन कुडचडे येथे विकसित भारत अभियान अंतर्गत कुडचडे मार्केट असोसिएशनशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या व्यापारी संमेलनावेळी आमदार नीलेश काब्राल, नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, कुडचडे बाजार संघटनेचे अध्यक्ष रोश परेरा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सिवरेज आणि अंडरग्राउंड केबलाच्या कामांमुळे रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. ते काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. ते रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. नाईन्टी टेन इमारत प्रकल्प २०२५ पर्यंत पर्ण होणार असन या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मी येणार आहे.
यावेळी स्थानिक आमदार नीलेश काब्राल म्हणाले, कुडचडे बाजारपेठ आणि बाजार संघटना आणि त्यांचे काही मुद्द्यांबद्दल या व्यापारी संमेलनावेळी मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत त्यांच्या समस्या मांडल्या.
रोश परेरा यांनी बाजारपेठ परिसरातील वेगवेगळ्या समस्या मांडताना सिवरेज आणि अंडरग्राउंड केबलाच्या कामामळे होणारे त्रास नगरपालिका व्यापार परवाना आणि नवीन कर तसेच बाजारपेठ परिसरात वाहतूक खात्यासमोर तसेच बाजारपेठ समोर असलेल्या वाहतूक सुरळीत करण्याच्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या.