"त्या" विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई द्या: घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा: आपची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: September 15, 2023 06:07 PM2023-09-15T18:07:04+5:302023-09-15T18:07:27+5:30
विद्यार्थी मृत घटनेची उच्च स्तरीय पातळीवर चौकशी करावी. कारण या घटनेमागे प्रशासनाची पूर्णपणे अनास्था दिसून येत आहे.
पणजी: पर्वरी येथील एससीईआरटीच्या जुन्या इमारतीवरुन पडून मृत पावलेल्या संजय स्कुलच्या विद्यारर्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई दिली जावी अशी मागणी आमआदमी पक्षाने(आप) समाज कल्याण खात्याकडे शुक्रवारी केली.
विद्यार्थी मृत घटनेची उच्च स्तरीय पातळीवर चौकशी करावी. कारण या घटनेमागे प्रशासनाची पूर्णपणे अनास्था दिसून येत आहे. वेळ पडल्यास याविरोधात फौजदारी खटला दाखल करु. पीडित युवकाला न्याय हा मिळालाच पाहिजे अशी मागणीही आप ने केली.
पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक म्हणाले, की पर्वरी येथील एससीईआरटीच्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाल्याने तेथून संजय स्कुल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे अशी मागणी वारंवार केली आहे. यासंबंधी गोवा राज्य दिव्यांग आयोगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी, संजय स्कुल व शिक्षण खात्याला पत्र व्यवहार सुध्दा केला होता. परंतु दरवेळी त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. अशेवटी पीडित युवक या इमारतीवरुन पडला व त्याचा नाहक बळी गेला. प्रशासनाच्या दुर्लक्षतेचा हा बळी आहे. सर्व सरकारी इमारतीे ची दुरुस्ती हाती घेतली जाईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी नमूद केले होते. मात्र त्यावेळी सुध्दा शिक्षण खात्याने संबंधीत एससीईआरटीच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीविषयी खात्याला कळवले नसल्याची टीका त्यांनी केली.