सनबर्नमध्ये ड्रग्स सेवन करून नाचणाऱ्या ५ जणांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:55 IST2025-01-01T07:55:42+5:302025-01-01T07:55:42+5:30
त्यांनी घातक ड्रग्सचे सेवन केल्याचे चाचणीतून सिद्धही झाले आहे.

सनबर्नमध्ये ड्रग्स सेवन करून नाचणाऱ्या ५ जणांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धारगळ येथे झालेल्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये ड्रग्सचा वापर होत नसल्याचा आयोजकांचा दावा असला, तरी या फेस्टिव्हलमध्ये ड्रग्स सेवन करून नाचणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांनी घातक ड्रग्सचे सेवन केल्याचे चाचणीतून सिद्धही झाले आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाचे अधीक्षक टिक्कम सिंग यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, सनबर्न पार्टीत आलेल्या पाच जणांना अमली पदार्थ सेवन केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची अमली पदार्थ सेवनासंबंधी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पाचही जण पॉझिटिव्ह आढळून आले.
पाचपैकी एकाने कोकेन हा घातक अमली पदार्थ तर इतरांनी गांजा व इतर काही प्रकारचे अमली पदार्थ सेवन केले होते, असे आढळले आहे. त्यांची चाचणी ही तत्काळ चाचणी कीटद्वारे करण्यात आली, तसेच मूत्राचे नमुनेही घेण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी एका युवकाचा नाचून गेल्यानंतर मृत्यू झाला होता. त्याळे राज्यात बरीच खळबळ उडाली आहे.
त्यावर भाष्य टाळले...
अधीक्षक ठिक्कम सिंग यांनी सांगितले की, सनबर्न फेस्टि- व्हलमध्ये ड्रग्सचा वापर केला जाणार नाही, यासाठी एएनसीचे पथक त्या ठिकाणी कार्यरत होते. पार्टीत जाणाऱ्यांची विशेष सीस्टमद्वारे तपासणी केली जात होती. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान, सनबर्नमध्ये सहभागी झालेल्या युवकाच्या मृत्यूविषयी भाष्य करणे अधीक्षकांनी टाळले. हे प्रकरण पेडणे पोलिस हाताळत आहेत. याविषयी त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी, असे ते म्हणाले.