५० कोटींची थकीत कर वसूलीचे मनपा समोर आव्हान; ३० जून पर्यंत ही रक्कम भरण्याची मुदत
By पूजा प्रभूगावकर | Updated: May 13, 2024 13:14 IST2024-05-13T13:14:00+5:302024-05-13T13:14:17+5:30
या थकीत ५० कोटी कराच्या रक्कमे पैकी ६५ टक्के रक्कम ही घरपट्टीची आहे. थकीत घरपट्टीची रक्कम ३३.७५ कोटी रुपये, स्वच्छता शुल्क ६.५२ कोटी रुपये तर व्यवसायिक ४.७० कोटी रुपये इतका आहे.

५० कोटींची थकीत कर वसूलीचे मनपा समोर आव्हान; ३० जून पर्यंत ही रक्कम भरण्याची मुदत
पणजी: पणजी महानगरपालिके (मनपा) समोर ५० कोटी रुपयांचा थकीत कर वसूलीचे आव्हान असून ३० जून पर्यंत ही रक्कम भरण्याचे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे. थकीत कराच्या वसूलीसाठी मनपाचे विशेष पथक स्थापन केले आहे.
या थकीत ५० कोटी कराच्या रक्कमे पैकी ६५ टक्के रक्कम ही घरपट्टीची आहे. थकीत घरपट्टीची रक्कम ३३.७५ कोटी रुपये, स्वच्छता शुल्क ६.५२ कोटी रुपये तर व्यवसायिक ४.७० कोटी रुपये इतका आहे. पणजी मनपाच्या कार्यक्षेत्रात रहिवासी व व्यवसायिक मिळून एकूण २६ हजार ४४८ युनिट्स असून यापैकी २२ हजार १४६ जणांनी कर भरला नाही.
पणजी मनपा ने १ एप्रिल पासून थकीत कराची वसूली सुरु केली असून ३० जून ही थकीत रक्कम भरण्याची अंतिम तारीख आहे. नागरिक ही रक्कम ऑनलाईन देखील भरु शकतात असे आवाहन मनपा सुत्रांनी केले आहे.