गोव्यातील मुरगावात ५० इंच पाऊस
By admin | Published: June 27, 2016 09:52 PM2016-06-27T21:52:51+5:302016-06-27T21:52:51+5:30
राज्यात सोमवारी दिवसभर सरासरी दीड इंच पाऊस पडला तर मुरगावात इंचाचे अर्धशतक गाठले आहे. मान्सून गोव्यात एकाच गतीने बरसत असून दर दिवसा दीड दोन इंच
पणजी: राज्यात सोमवारी दिवसभर सरासरी दीड इंच पाऊस पडला तर मुरगावात इंचाचे अर्धशतक गाठले आहे.
मान्सून गोव्यात एकाच गतीने बरसत असून दर दिवसा दीड दोन इंच पाऊस पडत आहे. राज्यात सरासरी पावसाने इंचाची चाळीसी गाठली आहे. सर्वात अधिक पाऊस मुरगाव व दाबोळी या भागात अनुक्रमे ५० इंच आणि ४२ इंच एवढा नोंद झाला आहे. त्यानंतर काणकोण, केपे व पणजीचा क्रमांक लागत आहे. वाळपई आणि फोंड्यात मात्र सर्वात कमी पाऊस पडला आहे. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १९ इंच व २३ इंच एवढाच पाऊस पडला आहे. पावसाचा प्रभाव असाच कायम राहिल्यास जून अखेरपर्यंत म्हणजे राहिलेल्या तीन दिवसात फोंडा व सत्तरी तालुका वगळल्यास ऊर्वरी भागात ५० टक्के होण्याची शक्यता आहे. दरम्यान मान्सून अत्यंत सक्रीय असून येत्या २४ तासात राज्यात सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यान म्हटले आहे.