काणकोणातील 50 टक्के घरांना शौचालयाची सोयच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:19 PM2019-01-01T18:19:40+5:302019-01-01T18:19:55+5:30

8831 घरांपैकी 4471 घरांना शौचालये : काही शौचालयांचा जळण ठेवण्यासाठी वापर

50% of kankon areas do not have toilets | काणकोणातील 50 टक्के घरांना शौचालयाची सोयच नाही

काणकोणातील 50 टक्के घरांना शौचालयाची सोयच नाही

Next

मडगाव: गोवा संपूर्णरित्या हांगणदारी मुक्त करण्याच्या तारखा दोनवेळा हुकलेल्या असताना आता नजिकच्या काळातही हे उद्दीष्टय़ पूर्ण करणो गोव्यासाठी एक आव्हानच ठरणार आहे. कारण दक्षिण गोव्यातील अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील 50 टक्के घरांना अजुनही शौचालयाची सोय नसल्याचे सरकारी सर्वेक्षणात दिसून आले आहे.


उघडय़ावरील शौचापासून पूर्णपणो मुक्त होण्यासाठी गोव्याने सुरुवातीला 2 ऑक्टोबर ही अंतिम तारीख ठेवली होती. त्यानंतर ही मुदत 19 डिसेंबर्पयत पुढे वाढवली होती. आता हे उद्दीष्टय़ पूर्ण करण्यासाठी मार्च 2019 ही तारीख ठेवण्यात आली आहे.


काणकोण तालुक्यातील आगोंद, खोल, खोतीगाव, गावडोंगरी,लोलये-पोळे, पैंगीण व श्रीस्थळ या सात गावातील 8831 घरांपैकी केवळ 4471 घरांनाच शौचालयाची सोय आहे तर 4360 घरांना अजुनही ही सोय नाही. या सर्वेक्षणातून आणखी एक गोष्ट पुढे आली आहे की ज्या घरांना शौचालयाची सोय आहे त्यापैकी 637 घरातील शौचालयांचा वापर करण्याऐवजी त्या घरातील लोक उघडय़ावरच शौच करणो अजुनही पसंत करत आहेत.


काणकोणातील काहीसा मागास गाव असलेल्या गावडोंगरीतील स्थिती तर अधिकच भयानक आहे. या गावातील 1290 घरापैकी केवळ 219 घरांनाच शौचालयाची सोय आहे. तर 1072 घरांसाठी ही सोय नाही. याचाच अर्थ या गावातील 80 टक्के घरातील लोक शौचालयाविना रहात आहेत. सर्वेक्षणातील अधिका:याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, या गावातील 763 घरांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा आहे. मात्र तरीही त्यांनी शौचालये बांधलेली नाहीत.


खोल गावातील 1426 घरांपैकी 961 घरांना शौचालयाची सोय नाही तर पैंगीणीतील 1763 घरांपैकी 764 घरांना शौचालये नाहीत. या तालुक्यातील ज्या 4360 घरांना शौचालये नाहीत त्यापैकी 2780 घरांच्याजवळ शौचालये बांधण्यासाठी जागा आहे. या तालुक्यातील काही शौचालयांचा वापर जळणाची लाकडे भरुन ठेवण्यासाठी केला जात असल्याचेही दिसून आले आहे. या तालुक्यातील स्थिती पहाता उघडय़ावर शौच करणो आरोग्यासाठी घातक असल्याचे गावक:यांना पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. या तालुक्यात महिला व वाढलेल्या मुलीही उघडय़ावरच शौच करत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: 50% of kankon areas do not have toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा