गोव्यात 50 टक्के दारुची दुकाने होणार बंद ?
By admin | Published: December 22, 2016 05:52 PM2016-12-22T17:52:35+5:302016-12-22T17:54:13+5:30
महामार्गावर मोठया प्रमाणावर दारु प्यायली जाते. या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर 30 ते 35 टक्के दारु विक्रीमध्ये घट येईल.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 22 - राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दारू विक्री बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गोव्यात 50 टक्के दारुची दुकाने बंद होऊ शकतात. यामुळे गोव्यात हजारो लोकांच्या रोजगारावर गदा येणार आहे.
महामार्गावर मोठया प्रमाणावर दारु प्यायली जाते. या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर 30 ते 35 टक्के दारु विक्रीमध्ये घट येईल तसेच महसूलात 20 ते 25 टक्के कमी येईल असा अंदाज आहे. दारु कंपन्यांसाठी गोवा महत्वाची बाजारपेठ आहे. या निर्णयामुळे निश्चित दारु उद्योगावर परिणाम होणार आहे.
गोव्याचे उत्पादन शुल्क आयुक्त मीनीनो डिसूझा यांनी गोव्यातील महामार्गावरील दारुच्या दुकानांची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. गोव्यात 11 हजारपेक्षा जास्त मद्य विक्रीचे परवाने जारी करण्यात आले आहेत. बहुतांश दारुची दुकाने महामार्गालगत आहे.