मच्छीमार एजंटकडे मागितली ५० हजारांची खंडणी;
By वासुदेव.पागी | Published: November 2, 2023 03:16 PM2023-11-02T15:16:02+5:302023-11-02T15:16:12+5:30
या प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने तिघाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पणजी: बेती येथील मालीम जेटीवर पहाटे पहाटे खंडणीखोर आले आणि मच्छिमार एजंट जवळ प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली ५० हजार रुपये मागू लागले. या प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने तिघाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी मागणारे तिघ जण होते. एकाचे नाव डॉमिनिक नजारेथ तर इतर दोघांची नावे बुद्ध आणि कुमार अशी असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्या दोघांचे पूर्ण नाव तक्रारदार साथीभ रामचंद्रन यांना ठाऊक नाही. तक्रारदार साथीभ हा महाराष्ट्र नागरिक असून तो मच्छिमार एजंट आहे. मालीम जेटीवर त्याचे कार्यालय आहे.
संशयीताकडून खंडणीसाठी दोन वेळा तक्रारदाराला धमकावण्यात आले. 27 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर असे दोन वेळा मालीमजेटीवर आणि मेरशी येथील चर्चजवळ संशयीतांकडून खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार घडले असे तक्रारीत म्हटले आहे. प्रोटेक्शन मनी म्हणून पन्नास रुपये खंडणी संशयित मागत होते असेही त्यांनी म्हटले आहे. मालेम जेटेवरील सर्वच एजंट कडे संशयित खंडणी मागून त्यांची छळ न करता अशा तक्रारी पोलिसांना आले आहेत.
या प्रकरणात क्राईम ब्रँच संशयीतांचा शोध घेत असून त्यांना केव्हाही अटक केली जाऊ शकते. क्राइम ब्रांच चे उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.