पाच वर्षात पन्नास हजार नोकऱ्या, आपचा युवा जाहिरनामा प्रकाशित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 08:27 PM2017-01-02T20:27:23+5:302017-01-02T20:27:23+5:30
आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास अनेक उद्योगधंदे गोव्यात आणू व पाच वर्षात पन्नास हजार नोक:या युवकांसाठी निर्माण करू, अशी ग्वाही आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास अनेक उद्योगधंदे गोव्यात आणू व पाच वर्षात पन्नास हजार नोक:या युवकांसाठी निर्माण करू, अशी ग्वाही आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनी सोमवारी येथे दिली. त्यांनी आपचा युवा जाहिरनामा प्रकाशित केला.
अॅड. सुरेल तिळवे, सिसिल रॉड्रीग्ज, वाल्मिकी नायक आदींच्या उपस्थितीत गोम्स यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही उद्योगांसाठी एक खिडकी योजना राबवू व लगेच त्यांना परवानगी देऊ. उद्योगांना कर सवलतही दिली जाईल. स्थानिकांना रोजगार संधी मिळावी म्हणून उद्योग उभा राहण्यापूर्वीच मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची अट लागू केली जाईल. हॉस्पिटेलिटी, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, कृषी, बायोफार्मास्युटिकल, करमणूक आदी क्षेत्रंमध्ये आम्ही उद्योग-धंद्यांना प्रोत्साहन देऊ, असे गोम्स यांनी सांगितले.
दोन नव्या स्टार्ट अप इनक्युबेशन सेंटरची स्थापना केली जाईल. स्वयंरोजगार योजनेखाली एका साध्या अर्जानंतर युवकांना व्यवसाय-धंदा सुरू करण्यासाठी 5क् लाखांचा पतपुरवठा केला जाईल. सरकार त्यासाठी हमीदार राहील. सरकारी विद्यालयांच्या साधनसुविधा वाढविल्या जातील. शिक्षकांना बिगशैक्षणिक कामांपासून म्हणजे निवडणूकविषयक व अन्य तत्सम कामांपासून मुक्त केले जाईल. महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरविल्या जातील, असेही गोम्स यांनी युवा जाहिरनाम्याद्वारे स्पष्ट केले. देशात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील त्यांना पंधरा लाखांचे व्याजमुक्त कर्ज आणि विदेशात शिक्षणासाठी पंचवीस लाखांचे कर्ज दिले जाईल, महाविद्यालयांना सांस्कृतिक व क्रिडाविषयक सोहळे आयोजित करण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य विद्यार्थी मंडळाकडे सोपविले जाईल. यामुळे विद्याथ्र्याना कुठच्याच राजकारण्यांकडे देणगी मागावी लागणार नाही, असे गोम्स म्हणाले.
क्रिडा क्षेत्रकडे सरकारने कधीच गंभीरपणो लक्ष दिले नाही. यामुळे अत्युच्च दर्जाचे क्रिडापटू निर्माण होण्यात अडचण येते. आम्ही राज्यात क्रिडा विद्यापीठ उभे करू. राज्यातील अनेक गावांमध्ये ज्या मोकळ्य़ा जागांमध्ये मुले खेळतात, अशा जागा सरकार प्रकल्पांसाठी ताब्यात घेते व मुलांवर अन्याय करते. आपण क्रिडा मैदान बांधणार असे सरकार जाहीर करून केवळ पायाभरणी करते व ते मैदान कायम स्वत:च्या ताब्यात ठेवते. आम्ही अशी साडेतीनशे मैदाने मुलांसाठी खेळण्यास मोकळी करू. तसेच सत्तेवर येताच क्रिडा खात्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद दुप्पट करू, असे गोम्स यांनी सांगितले. बारा रविंद्र भवने बांधली जातील. शिवाय नाटक, तियात्र अशा उपक्रमांसाठी एकूण चाळीस मांड लोकांसाठी उपलब्ध केले जातील, असे गोम्स यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)