केंद्राकडून गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा
By किशोर कुबल | Published: June 11, 2024 01:37 PM2024-06-11T13:37:43+5:302024-06-11T13:38:06+5:30
केंद्र सरकारने गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा जाहीर केला आहे.
पणजी : केंद्र सरकारने गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा जाहीर केला आहे. ही रक्कम राज्य सरकारला विकास आणि भांडवली खर्चाला गती देण्यासाठी सक्षम करेल, अशी अपेक्षा आहे. देशभरात गोव्याचा वाटा सर्वात कमी असून राज्य २८ व्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशला कर हस्तांतरणाचा सर्वाधिक २५,०६९ कोटी रुपये वाटा मिळालेला आहे.
केंद्राने राज्यांना चालू महिन्यासाठी कर हस्तांतरणाचा वाटा म्हणून एकत्रितपणे १,३९,७५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दरम्यान,गोव्याचे जीएसटी संकलन गेल्या एप्रिलमध्ये २३ टक्क्यांनी वाढले. एप्रिलमध्ये गोव्याला ७६५ कोटी जीएसटी महसूल मिळाला. २०२३ मध्ये एप्रिलमध्ये ६२० कोटी रुपये जीएसटी महसूल मिळाला होता.