गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी पदे भरली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 11:50 AM2024-03-13T11:50:00+5:302024-03-13T11:50:17+5:30
'मे'मध्ये मुलाखती
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी इन्स्ट्रक्टर पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी मे महिन्यात इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती होतील. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) हा विषय सरकारी व अनुदानित शाळा तसेच अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी या इन्स्ट्रक्टर पदांची भरती केली जात आहे. या विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयटी लॉजिस्टिक्स, ब्युटी अॅण्ड वेलनेस, प्लंबिंग, हेल्थकेअर, कृषी आदींचा समावेश आहे. हे इन्स्ट्रक्टर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त केले जातील.
'मे'मध्ये मुलाखती
या पदासाठी दि. ८ व ९ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या कार्यालयात मुलाखती होणार आहेत. या उमेदवारांना २० हजार रुपये महिना इतका पगार मिळेल, याशिवाय डेटा एन्ट्री ऑपरेटर, ब्लॉक रिसोर्स पर्सन व व अकाउंट ऑफिसर ही पदेही कंत्राटी पद्धतीवर भरली जातील. या पदांसाठी नियोजित दिवशीच मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://
www.scert.goa.gov.in यावर संपर्क साधावा, असे कळवले आहे.