५८ वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 09:32 PM2019-12-01T21:32:30+5:302019-12-01T21:56:49+5:30

पगार देण्यात येत नसल्याने त्रस्त होऊन राजन नायरने आत्महत्या केली असावी असा प्रथम अंदाज

58 year-old man burns herself to death | ५८ वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून केली आत्महत्या

५८ वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून केली आत्महत्या

Next

वास्को: वेर्णा येथील खुल्या जागेत राजन नायर नावाच्या ५८ वर्षीय इसमाने रविवारी (दि.१) संध्याकाळी स्वत:ला आग लावून आत्महत्या केली. खुल्या जागेत टाकण्यात आलेल्या लाकडांना आग लावून त्याच्या घालून देऊन राजन यांने आत्महत्या केल्याची माहीती पोलीसांनी दिली. जळून आत्महत्या केलेला राजन नायर यास काही काळापासून एका कंपनीने त्याचे पैसे दिले नसल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याचे वेर्णा पोलीसांना प्रथम चौकशीत समजले आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सदर घटना घडली. राजन नायर हा ५८ वर्षीय इसम सावंतवाडी, महाराष्ट्रा येथील रहीवाशी आहे. तो मागच्या काही काळापासून गोव्यातील एका कंपनीत कामाला असल्याचे पोलीसांना चौकशीत समजले आहे. रविवारी संध्याकाळी राजन यांने उपासनगर, वेर्णा येथील खुल्या जागेत असलेल्या लाकडांना आग लावून नंतर त्यांने त्याला आत झोकून दिले. राजन याने स्वताला आगीत झोकून दिल्याचे त्याच्या एका साथिदाराला कळताच त्यांने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा फायदा झाला नसून सदर घटनेत तो मरण पोचला. 

वेर्णा अग्निशामक दलाला याबाबत माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन येथे लागलेली आग विझवली. मयत राजन याचा मृतदेह वेर्णा पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो गोमॅकॉ इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. राजन याने आत्महत्या का केली याबाबत वेर्णा पोलीस तपास करीत असून जेथे तो काम करत होता त्या कंपनीने त्याला सुमारे सहा महीन्यापासून पगार दिला नसल्याने त्रस्त झालेल्या राजन यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असे पोलीसांना सुरवातीच्या तपासणीत समजले आहे. राजन याच्या एका साथिदाराची जबानी पोलीसांनी नोंद केली असून सदर आत्महत्या प्रकरणात वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 58 year-old man burns herself to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.