६ वर्षीय मुलीचा डेंग्यूवर उपचार घेताना मृत्यू

By पंकज शेट्ये | Published: November 14, 2023 05:09 PM2023-11-14T17:09:29+5:302023-11-14T17:09:57+5:30

नवेवाडे येथील दुर्गामाता मंदिराजवळ राहणाऱ्या ६ वर्षीय वाणीला ताप येत असल्याने सोमवारी संध्याकाळी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणले होते.

6-year-old girl dies while being treated for dengue | ६ वर्षीय मुलीचा डेंग्यूवर उपचार घेताना मृत्यू

६ वर्षीय मुलीचा डेंग्यूवर उपचार घेताना मृत्यू

वास्को: डेंग्यू तापावर उपचार घेत असलेल्या नवेवाडे, वास्को येथील ६ वर्षीय वाणी खानापूर नामक बालिकेचा मंगळवारी (दि.१४) सकाळी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात मृत्यू झाला. वाणी खानापूर हिच्यावर चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचार चालू असताना पहाटे तिचा रक्तदाब अचानक कमी व्हायला लागल्यानंतर तिला पुढच्या उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात पाठवले, मात्र तेथे तिचा मृत्यू झाला. चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी वाणी वर उपचार करण्याबाबत केलेल्या निष्काळजीपणा मुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी करून ह्या प्रकरणात सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

नवेवाडे येथील दुर्गामाता मंदिराजवळ राहणाऱ्या ६ वर्षीय वाणीला ताप येत असल्याने सोमवारी संध्याकाळी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणले होते. तेथे तिच्यावर डेंग्यूबाबत ‘एनएस१’ तपासणी केली असता तिला डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले होते. मंगळवारी पहाटे अचानक वाणीची प्रकृती बिघडल्याने तिला त्वरित बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पुढच्या उपचारासाठी नेले, मात्र तेथे तिचा मृत्यू झाला. चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचार घेताना वाणीचा रक्तदाब अचानक कमी व्हायला लागल्याने तिला पुढच्या उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात पाठवले होते अशी माहीती चिखली उपजिल्हा इस्पितळातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

दरम्यान चिखली उपजिल्हा इस्पितळातील सोमवारी रात्री ड्युटीवर असलेल्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे वाणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या एका नातेवाईकाने पत्रकारांशी बोलताना केला. सोमवारी रात्री वाणीचे हात पाय थंड पडायला लागल्याचे समजताच आम्ही त्वरित डॉक्टर - पारिचारिकांना त्याबाबत कळविले. मात्र डॉक्टर अथवा पारिचारीका पूर्ण रात्र वाणीला तपासण्यासाठी आलेच नाही अशी माहिती नातेवाईकाने दिली. मंगळवारी पहाटे त्यांची झोप पूर्ण झाल्यानंतर त्यांनी येऊन वाणीला तपासले असता वाणीचा रक्तदाब अचानक कमी होऊन तिची प्रकृती गंभीर झाल्याचे चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांना समजले. त्यानंतर पहाटे ६ च्या सुमारास तिला पुढच्या उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात पाठवले. मात्र तेथे तिचा मृत्यू झाला.

रात्रीच चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरने वाणीला तपासले असता वेळेवरच तिच्यावर योग्य उपचार होऊन ती वाचली असती असे तिचा नातेवाईक म्हणाला. वाणीचा सद्रुश्य डेंग्यू तापावर उपचार घेताना मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमागे डॉक्टरचा निष्काळजीपणा असल्याचे नातेवाईक - शेजारी इत्यादींना कळताच सकाळी चिखली उपजिल्हा इस्पितळाबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक जमून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच सोमवारी रात्री ड्युटीवर असलेल्या डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमावाने केली. मरण पोचलेल्या ६ वर्षीय वाणी खानापूर हीच्यावर मंगळवारी दुपारी अंतिमसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. वाणी तिच्या आई - वडीलाची एकुलती एक मुलगी होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून तिच्या निधनामुळे कुटूुबावर दुख्खाचा डोंगर कोसळला आहे. 

वाणीचा मृत्यू चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरच्या निष्काळजीपणा मुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने त्यात योग्य चौकशी करून ते खरे असल्यास संबंधित डॉक्टरवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले यांनी केली. मंगळवारी सकाळी नवेवाडे भागातील अन्य दोन मुलींना (एकाचे वय ७ तर दुसरीचे ९) उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात आणले होते. त्यांच्यावरही ‘एनएस१’ चाचणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या मुलींना इस्पितळात दाखल न करता अथवा गोमॅकॉ इस्पितळात न पाठवता त्यांना सुमारे तीन तास बाहेर बसवून ठेवले होते. त्या मुलींना बाहेर बसवून ठेवल्याचे जमलेल्या लोकांना पाहून संताप व्यक्त केल्यानंतर त्यांना इस्पितळात आत घेतले अशी माहीती नगरसेवक सुदेश भोसले यांनी दिली. हा प्रकार योग्य नसून चिखली उपजिल्हा इस्पितळात सर्व रुग्णांना चांगली सुविधा मिळणार याबाबत आरोग्यमंत्र्यांनी उचित पावले उचलवावी असे ते म्हणाले. चिखली उपजिल्हा इस्पितळात डॉक्टर, पारिचारीका यांच्यासहीत विविध सुविधांचा अभाव असून लोकांच्या हितासाठी तो दूर करावा असे भोसले म्हणाले.

Web Title: 6-year-old girl dies while being treated for dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.