‘ब्रिक्स’साठी ६० कोटींचे रस्ते

By Admin | Published: September 28, 2016 01:53 AM2016-09-28T01:53:11+5:302016-09-28T01:59:12+5:30

पणजी : येत्या दि. १४ आॅक्टोबरपासून दक्षिण गोव्यात होणाऱ्या तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा तपशीलवार आढावा

60 million roads for 'BRICS' | ‘ब्रिक्स’साठी ६० कोटींचे रस्ते

‘ब्रिक्स’साठी ६० कोटींचे रस्ते

googlenewsNext

पणजी : येत्या दि. १४ आॅक्टोबरपासून दक्षिण गोव्यात होणाऱ्या तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी घेतला. एकूण ६० कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच १७३ वाहनांचा वापर केला जाणार आहे. एकूण ६१ टॉवर्स दक्षिण गोव्यात उभे केले जातील.
ब्रिक्स परिषदेच्या तयारीसाठी सरकारने खास सचिवालयाची स्थापना केली आहे. या सचिवालयाची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री पार्सेकर हे या सचिवालयाचे अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपाध्यक्ष आहेत. डिसोझा यांच्यासह मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव तसेच वरिष्ठ पोलीस
अधिकारी व साधनसुविधा विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
बैठकीत भाग घेतला.
उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले की, ब्रिक्स परिषदेवेळी वेर्णा ते दाबोळी विमानतळापर्यंतच्या मार्गावर सौंदर्यीकरण केले जाईल. खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे; कारण हजारभर महनीय व्यक्ती या परिषदेस येणार आहेत. अनेक राष्ट्रांचे प्रमुख सहभागी होतील. त्यांच्या सुरक्षेसाठी जास्त मनुष्यबळ वापरावे लागेल. (खास प्रतिनिधी)

Web Title: 60 million roads for 'BRICS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.