वेर्णा महामार्गावरील अपघातात ६० वर्षीय पादचारी ठार; १९ वर्षीय दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 09:13 PM2020-01-09T21:13:13+5:302020-01-09T21:13:23+5:30

राहुल पळ या अपघातात गंभीर जखमी

60-year-old pedestrian killed in accident on Verna Highway; The 19-year-old bicyclist was injured | वेर्णा महामार्गावरील अपघातात ६० वर्षीय पादचारी ठार; १९ वर्षीय दुचाकीस्वार जखमी

वेर्णा महामार्गावरील अपघातात ६० वर्षीय पादचारी ठार; १९ वर्षीय दुचाकीस्वार जखमी

googlenewsNext

वास्को: गुरूवारी (दि. ९) सकाळी वेर्णा चौपदरी महामार्गाच्या बाजूने चालत जात असलेल्या ६० वर्षीय चंद्रप्पा खातापूर (रा: बिर्ला, झुआरीनगर) या वृद्ध इसमाला दुचाकीने जबर धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात युवा दुचाकीस्वार राहुल पळ (वय १९) गंभीर रित्या जखमी झालेला असून त्याच्यावर बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू आहे.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास सदर अपघात घडला. बोगदा, सडा येथे राहणारा राहुल पळ हा युवक ‘पेशन प्रो’ दुचाकीने (क्र: जीए ०६ एच ९०११) जात असताना तो ‘झुआरी इंडीयन ऑइल टँकींग लिमिटेड’ व्यवस्थापनाच्या बाहेरील महामार्गावर पोचला असता त्याचा अचानक दुचाकीवरील ताबा गेला. त्यांने समोरून चालत येत असलेल्या चंद्रप्पा खातापूर या वृद्ध इसमावर जाऊन दुचाकीसहीत जबर धडक दिली. सदर अपघातात चंद्रप्पा जागीच ठार झाल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. तसेच या अपघातात राहुल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

सदर प्रकरणात वेर्णा पोलीसांनी इस्पितळात उपचार घेत असलेला दुचाकीस्वार राहुल पळ याच्या विरुद्ध भादस २७९, ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून याबाबत त्यांच्याकडून अधिक तपास चालू आहे.

Web Title: 60-year-old pedestrian killed in accident on Verna Highway; The 19-year-old bicyclist was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात