कदंबा महामंडळाच्या ताफ्यात लवकरच येणार नवीन ६४ बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:28 PM2024-05-13T16:28:02+5:302024-05-13T16:28:34+5:30
कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक नारायण नाईक म्हणाले, कदंबा महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस झाल्या आहेत.
पणजी (नारायण गावस): कदंबा महामंडळातर्फे राज्यात लवकरच ५० डिझेल आणि १४ नवीन इलेक्ट्रिक बसेसे येणार आहेत. या ९ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस हैदराबादहून कदंबा महामडंळानेने मागवलेल्या ९८ बसेसचा एक भाग आहे. या नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि डिझेल बसेस राज्यातील आंतरराज्य मार्गांवर तैनात केल्या जातील. यामुळे निवासी प्रवासी आणि पर्यटकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करतील.
कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक नारायण नाईक म्हणाले, कदंबा महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस झाल्या आहेत. ज्या १५ वर्षे पेक्षा जास्त झाल्या आहेत. त्या भंगारात काढण्यात येणार आहे. त्याच्या जागी या नव्या इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार आहे.
जुन्या डिझेल बसेस बदलण्या सोबत महामंडळ सार्वजनिक लोकांच्या मागणीवर दुर्गम भागात, त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राज्यात बसेसचे जाळे वाढवण्यासाठी आम्ही नवीन मार्गांची योजना करू, असे नाईक म्हणाले.
नाईक म्हणाले, कदंबा महामंडळ गोवा ते मालवण ही बससेवा पुन्हा सुरू करणार आहे. सध्या, कदंबा महामंडळाच्या ताफ्यात ४४९ डिझेल बस आणि ४८ इलेक्ट्रीक बसेसचा समावेश आहे. १४ नवीन इलेक्ट्रिक बस आणि उर्वरित ९८ ईव्ही जोडण्याबरोबरच कदंबाने गोवा ते मालवण ही बस सेवा पुन्हा सुरू केल्याची घोषणा केली आहे. सुरळीत आंतरराज्यीय वाहतुकीसाठी या मार्गाच्या पुनर्स्थापनेमुळे दोन राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.