पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

By admin | Published: July 20, 2016 12:27 PM2016-07-20T12:27:09+5:302016-07-20T13:23:18+5:30

विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

75 per cent Goa 'full' in monsoon | पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

Next

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. २० - उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पावसाच्या मोसमात देखील गोव्यात हॉटेलांच्या 75 टक्के  खोल्या आरक्षित  आहेत. त्यामुळे गोव्याला आता वर्षाचे बाराही महिने सतर्क रहावे लागेल कारण पर्यटन मोसम वाढला आहे असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 
 
विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दि. 25 पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे असे आपले मत आहे.
 
राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांनी महायुती केली तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युत्या होत असतात. मात्र अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रिकरण झाले असे होत नसते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल असे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी म्हटले आहे खरे पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते इशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील, कारण त्या भागाच्या ते संपर्कात असतात. येत्या अधिवेशनात विरोधकांनी कितीही प्रश्न विचारावेत पण ते विषयाचा अभ्यास गंभीरपणो किती करतात किंवा त्यांच्या टीकेस किती प्रमाणात खोली असते लोकांना ठाऊक आहे.
 
सासष्टीत पाठींबा वाढला
पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारसाठी सासष्टी तालुक्यात देखील पाठींबा वाढला आहे. आपण तीन एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी सासष्टीतील काही मतदारसंघांमध्ये गेलो, तिथे लोकांची मोठी गर्दी पाहिली. आपल्याला पोहचण्यास अर्ध्या तासाचा विलंब झाला तरी, लोक थांबले होते असे आढळून आले. तीन एलईडी बल्ब म्हणजे काहीच नव्हे पण लोक सोहळ्य़ावेळी प्रतीक्षा करतात यावरून सरकारची लोकप्रियता कळून येते. आम्ही प्रतिकुल परिस्थितीतही राज्य ब-यायापैकी चालवले. 
 

Web Title: 75 per cent Goa 'full' in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.