गोव्यात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनसंख्या 75 टक्के, अपघातांबाबत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 12:15 PM2017-11-16T12:15:53+5:302017-11-16T12:19:50+5:30
गोव्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात वाहन संख्या 12 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण 75 टक्के झाले आहे.
पणजी : गोव्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात वाहन संख्या 12 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण 75 टक्के झाले आहे. वाढते अपघात ही चिंताजनक बाब बनली आहे, अशी खंत वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. राष्ट्रीय रस्ता आणि महामार्ग मंत्रलयातर्फे गोवा सरकारचे वाहतूक खाते व कदंब वाहतूक महामंडळ यांच्या सहकार्याने येथे आयोजित रस्ता सुरक्षा परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री ढवळीकर बोलत होते. एकूण वाहनांमध्ये 60 टक्के प्रमाण हे दुचाकींचे आहे. हेल्मेट न घालता दुचाकीस्वार गाडी हाकतात व अपघातात बळी पडतात. आपण स्वत: गुरुवारी फोंडा ते पणजी असा सकाळी प्रवास करत असताना दोन पोलीस रस्त्यावरून समांतरपणे दुचाकी चालवत आहेत व दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही, असे आपल्याला आढळून आले.
एकाने स्टाईल म्हणून हेल्मटे हाताला घातले होते. आपण दोघांनाही थांबवले व तुम्ही पोलीस असतानादेखील हेल्मेट घालत नाही का? अशी विचारणा केली. त्यानंतर हाताला ज्याने हेल्मेट घातले होते, त्याने ते डोक्यावर परिधान केले, असा अनुभव मंत्री ढवळीकर यांनी उपस्थितांना सांगितला. मी स्वत: एकदा कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेलो असताना सीट बेल्ट घालायला विसरलो होतो. रस्ता सुरक्षेविषयी जागृत असलेल्या रोलंड मार्टिन्स या कार्यकत्र्याने काणकोण चावडी येथे माङो वाहन थांबवून मला बेल्ट घालण्याची विनंती केली होती. त्यांची ती भूमिका योग्य होती. रस्ता सुरक्षेविषयी अशा प्रकारे प्रत्येकानेच जागृत असायला हवे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
राज्यात महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. सहा ते आठपदरी महामार्ग सध्या बांधले जात आहेत. त्यात पुलांचाही समावेश होतो. विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र लेन बांधली जाईल. त्या स्वतंत्र लेनमधून दुचाकी चालविल्या जायला हव्यात. काही रस्त्यांवर सध्याही तशी तरतूद आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. राज्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत पण येत्या महिन्यात राज्यातील सर्व रस्त्यांवरील सगळे खड्डे बुजविले जातील, अशी ग्वाही मंत्री ढवळीकर यांनी दिली. केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील नव्या तरतुदींमुळे यापुढे वाहतूक नियमांचा भंग करणा-याला किमान एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मद्यपी चालकाला दहा हजारांचा दंड भरावा लागेल. जर कुणा अल्पवयीन मुलाने दुचाकी चालविताना अपघात केला व दुस:याचा बळी घेतला, तर त्या चालकासह त्याच्या पालकांनाही तुरुंगवासाची शिक्षा होईल. तशी तरतुद कायद्यात केली जात असल्याचे ढवळीकर यांनी जाहीर केले.
यावेळी वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई, कदंबचे वरिष्ठ अधिकारी संजय घाटे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग मंत्रलयाचे अधिकारी व्यासपीठावर होते. रस्ता सुरक्षेविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वानीच वारंवार एकत्र यायला हवे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर