बोगस फेसबुक अकाउंट करुन ७५ हजार रुपयांचा घातला गंडा; पोलिसांत तक्रार नोंद
By सूरज.नाईकपवार | Updated: March 30, 2024 10:52 IST2024-03-30T10:50:42+5:302024-03-30T10:52:13+5:30
पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.

बोगस फेसबुक अकाउंट करुन ७५ हजार रुपयांचा घातला गंडा; पोलिसांत तक्रार नोंद
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: बोगस फेसबुक अकाउंन्ट तयार करुन गोव्यातील मडगाव येथील एका इसमाला ७५ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी आके आल्त येथील एल्वीस बार्रेटो यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भादंसंच्या ४२० कलमाखाली पोलिसांन वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे.
पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.अभिषेक खत्री नावाच्या एका व्यक्तीने तक्रारदाराचा मित्र ऑस्कर पीटर फर्नांडीस यांच्या नावे बोगस फेसबुक अकांउट तयार केला व नंतर मेसेंजरच्या माध्यमातून तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली. नंतर मडगावच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून तक्रारदाराने गुगल पे व्दारे संशयिताला ७५ हजार रुपये दिले. शेवटी आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंबधी रितसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पुढील पोलिस तपास चालू आहे.