गोव्यात आजपासून 76 तास अखंड कोसळणार... काव्यमय पाऊस !
By admin | Published: July 20, 2016 08:10 PM2016-07-20T20:10:30+5:302016-07-20T20:11:21+5:30
कला अकादमी गोवा आयोजित 76 तासांचे अखंड कविता सादरीकरण महोत्सव म्हणजेच कायव्यहोत्रचे गुरुवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता उपसभापती व कला अकादमीचे
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 20 - कला अकादमी गोवा आयोजित 76 तासांचे अखंड कविता सादरीकरण महोत्सव म्हणजेच कायव्यहोत्रचे गुरुवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता उपसभापती व कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महोत्सवात एक हजारपेक्षा जास्त कवींची नोंदणी झाली असून पंचवीसहून अधिक भारतीय भाषांतील कवितांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे, अशी माहिती विष्णू वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय साहित्य अकादमी सचिव श्रीनिवास राव, गोवा कोकणी अकादमी अध्यक्ष वेणी माधव बोरकर, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष अनिल सामंत, दाल्गादो कोकणी अकादमी अध्यक्ष प्रेमानंद लोटलीकर, मिनेङिास ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर, कला व संस्कृती जम्मू-काश्मीर सचिव डॉ. हजीझ हाजिनी उपस्थित असतील.
या वेळी शब्दार्थी या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवीही या संमेलनात सहभागी होतील. उद्घाटन समारंभानंतर दुपारी 12 ते 2 या कालावधीत बहुभाषिक काव्य सादरीकरण प्रस्तुत होणार आहे. तसेच महोत्सवावेळी दीनानाथ मंगेशकर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.
हास्यव्यंगात्मक कविता
काव्यहोत्रच्या समारोप सत्रत 24 जुलै रोजी दुपारी 1 ते 3 पर्यंत हिंदी हास्यव्यंगात्मक कवितांचे सादरीकरण देशातील नामवंत हिंदी कवी वरुण चतुर्वेदी, पद्मसिंग अलबेला, लतुरी लाल लथ्थ व चेतना शर्मा यांच्याकडून केले जाईल. या हास्यव्यंगात्मक कवितांचे सादरीकरण काव्यहोत्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असणार आहे.