रमेश तवडकर मारहाण प्रकरणातून आठजण निर्दोष; पुरावेच नसल्याने संशयिताना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 07:44 PM2020-03-11T19:44:22+5:302020-03-11T19:44:34+5:30
२५ मे २०११ रोजी ही घटना घडली होती. आपल्याला नेमकी कुणी मारहाण केली त्यांना तवडकर ओळखू शकले नव्हते त्याचा फायदा संशयिताना मिळाला.
मडगाव: २०११च्या उटा आंदोलनाच्या वेळी उटा नेते व माजी आमदार रमेश तवडकर यांना केलेल्या मारहाण प्रकरणातून बाळ्ळीच्या आठ स्थंनिकांची मडगावच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सई प्रभुदेसाई यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. २५ मे २०११ रोजी ही घटना घडली होती. आपल्याला नेमकी कुणी मारहाण केली त्यांना तवडकर ओळखू शकले नव्हते त्याचा फायदा संशयिताना मिळाला.
बाळ्ळी येथील प्रशांत फळदेसाई , मोहन फळदेसाई, सत्येंद्र फळदेसाई, अरुण फळदेसाई, विनोद फळदेसाई, दयानन्द खोलकर, भुपेश नाईक देसाई व सुरेन्द्र फातर्पेकर यांच्या विरोधात बेकायदा जमाव जमविणे व तवडकर यांना मारहाण करणे असे गुन्हे ठेवण्यात आले होते. गोव्यातील आदिवासींच्या मागण्यासाठी २०११ मध्ये बाळ्ळीत उग्र आंदोलन झाले होते. त्यावेळी आंदोलकाकडून झालेली जाळपोळ आणि स्थानिकांची सतावणूक यांना कंटाळून स्थांनीकांनीही आंदोलकांना मारहाण केली होती त्यात तवडकर यांचाही समावेश होता. हे प्रकरण नंतर तपासासाठी सीबीआयकडे दिले होते.
या प्रकरणात ५५ साक्षीदारांच्या साक्षी पेश करण्यात आल्या. मात्र आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. सीबीआयच्यावतीने ए. एस. चांद तर संशयिताच्या वतीने अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडली.