राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ८०० पोलिस तैनात; वाहतूक व्यवस्थापनावेळी नागरिकांनी सहकार्य करावे
By पूजा प्रभूगावकर | Published: October 25, 2023 01:30 PM2023-10-25T13:30:23+5:302023-10-25T13:31:02+5:30
वाहतूक पोलिस अधीक्षक
पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मान्यवर येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेच्या कामासाठी ८०० वाहतूक पोलिस तैनात केले जातील अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार असल्याचे लोकांनी सहकार्य करावे. या एकूणच या स्पर्धेवेळी वाहतूक व्यवस्थापनसाठी वाहतूक पोलिसांसह पोलिस प्रशिक्षण केंद्र तसेच आयआरबी पोलिसही तैनात केले जातील असे त्यांनी सांगितले.
अधीक्षक कौशल म्हणाले, की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी व खेळाडू मोठया संख्येने येणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनात बदल केले आहेत. त्याबाबत वाहतूक पोलिसांनी ॲडव्हायझरी जारी केली आहेत. उद्घाटन हे संध्याकाळी ५ वाजता होईल. त्यामुळे सदर मार्ग हे वाहतूकीसाठी काही तास अगोदर बंद असतील. साधारणता रात्री ९ वाजे पर्यंत रस्ते बंद असतील. उत्तर गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यास लोकांना अडचण होऊ नये यासाठी त्यांनी लवकर घरातून निघावे असे त्यांनी सांगितले.