गोव्यात आचारसंहिताकाळात ८.५ कोटींचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:04 PM2019-04-19T12:04:48+5:302019-04-19T12:05:13+5:30

निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे.

8.5 crore worth of goods were seized during lok sabha code of conduct in goa | गोव्यात आचारसंहिताकाळात ८.५ कोटींचा माल जप्त

गोव्यात आचारसंहिताकाळात ८.५ कोटींचा माल जप्त

Next

पणजी : गोव्यात निवडणूक आचारसंहिता काळात आतापर्यंत रोख, मद्य, ड्रग्स आणि इतर मिळून ८ कोटी ४६ लाख ९६ हजार ४३ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. 


निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे. या काळात आतापर्यंत २ कोटी ३१ लाख ७0 हजार ६३0 रुपये रोख, ५ कोटी ८३ लाख २२ हजार ६७७ रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले. ४३२४ शस्रे दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा करण्यात आली. तर ५ शस्रे जप्त करण्यात आली. 


फौजदारी दंड संहितेच्या कलम १0७ खाली २८९ जणांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. कलम १0९ खाली ७२ जणांविरुध्द, कलम ११0 खाली ८0 जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले. 


दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण निवडणूक प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस मिळून सुमारे १५ हजार कर्मचारी राबत आहेत. ‘मनी लाँडरिंग’च्या बाबतीत कडक धोरण अवलंबिण्यात आले आहे. मटका, अंमली पदार्थ व्यवहार तसेच बाजारातील घाऊक खरेदी तसेच ऑनलाइन व्यवहार यावर आयोगाची बारकाईने नजर आहे. निवडणूक खर्चाच्या बाबतीतही आम्ही लक्ष ठेवून आहोत. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथके सजग आहेत. चेक नाक्यांवर कडेकोट तपासणी केली जात आहे. वाणिज्य कर खाते, अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांचीही नजर आहे. 
 

Web Title: 8.5 crore worth of goods were seized during lok sabha code of conduct in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.