मराठी-कोकणीच्या ८७ शाळांना परवानगी!
By admin | Published: April 27, 2016 01:59 AM2016-04-27T01:59:16+5:302016-04-27T01:59:16+5:30
पणजी : राज्यात गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमाच्या ५६ व कोकणी माध्यमाच्या ३१ नव्या शाळा सुरू करण्यास आमच्या
पणजी : राज्यात गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमाच्या ५६ व कोकणी माध्यमाच्या ३१ नव्या शाळा सुरू करण्यास आमच्या सरकारने परवानगी दिली. आम्ही एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी दिली नाही. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांनी याचा विचार करावा व भाजपची तुलना काँग्रेस पक्षाबरोबर करण्याचे प्रकार बंद करावेत, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे दिला.
दिल्लीहून परतल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण शंभर मराठी-कोकणी शाळांना परवानगी मिळू शकते. आतापर्यंत ८७ शाळांना आम्ही परवानगी दिली. भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते आमच्याविरुद्ध व्यक्तिगत स्तरावर येऊन बोलत आहेत. आपल्या मांद्रे मतदारसंघात त्यांनी खूप शक्ती लावली व आमच्या सगळ्या विरोधकांना एकत्र केले, तरी देखील ते सभेस मोठी गर्दी जमवू शकले नाहीत.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप व काँग्रेस यात फरक आहे. काँग्रेस सरकारच्या काळात इंग्रजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जात होती. मी आताही सांगतो
(पान ४ वर)