८८.१० टक्के
By admin | Published: May 11, 2015 02:11 AM2015-05-11T02:11:21+5:302015-05-11T02:11:37+5:30
पणजी : गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ८८.१० टक्के असा विक्रमी निकाल लागला. हा निकाल आतापर्यंतचे सर्व
पणजी : गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ८८.१० टक्के असा विक्रमी निकाल लागला. हा निकाल आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारा ठरला. विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९८.८१, कला शाखेचा ८४.३७ आणि वाणिज्य शाखेचा ८९.१३, तर व्यावसायिक शाखेचा निकाल हा ८५.८८ टक्के लागला.
शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेरो यांनी गोवा शिक्षण खात्याच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी निकाल जाहीर केला. त्याचवेळी तो इंटरनेटद्वारे संकेतस्थळांवरही (वेबसाईटवर) उपलब्ध झाला. या वर्षी १५,७११ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १५,७०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३,८३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही विशिष्ट विषय घेऊन बसलेल्या ४६५ विद्यार्थ्यांपैकी १६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शालान्त मंडळाच्या आणि गोव्याच्या इतिहासातही हा पहिला असा निकाल आहे की त्यात परीक्षार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्ण टक्केवारीही प्रचंड आहे. आतापर्यंत २०१२ मध्ये सर्वात अधिक म्हणजे १३ हजार ७०१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले होते. सर्वात अधिक निकाल ८५.५४ टक्के लागला होता. यंदा सर्वाधिक परीक्षार्थी, सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी आणि सर्वाधिक उत्तीर्ण टक्केवारी असे सर्व विक्रम मोडले आहेत. २०१२ वर्षापेक्षा १९५० विद्यार्थी अधिक बसले होते, आणि २४१७ विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झाले. २०१४ वर्षापेक्षा यंदा ३९९१ विद्यार्थी अधिक बसले होते तसेच ३८१३
इतके विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झालेत.
(वृत्त/हॅलो ४)