९६ वर्षांचे प्रभाकर बनवतात गणेशमूर्ती; १४व्या वर्षांपासून जडली कलेची आवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:22 AM2023-08-24T09:22:25+5:302023-08-24T09:23:53+5:30
आता ते सुमारे २०० गणेशमूर्ती ते बनवतात.
लोकमत न्यूज नेटवर्क पोबुर्पा : पोंबुर्पा कलाकार प्रभाकर शेट शिरोडकर हे वयाच्या ९६व्या वर्षीही गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. वयाच्या १४व्या वर्षी त्यांना गणेशमूर्ती बनवण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी बिठ्ठोण येथे असलेले गणपतीची मूर्ती बनवणारे एक कलाकार नोनी शिरोडकर यांच्याकडून गणपती बनवण्याची कला आत्मसात करून घेतली.
नोनी शिरोडकर हेसुद्धा गणपतीची मूर्ती बनवणारे राज शिरोडकर यांचे वडील होते. तेसुद्धा चांगले मूर्तिकार होते. त्यांच्याकडून मूर्ती बनवण्याचे काम प्रभाकर शिकले व नंतर त्याने पोंबुर्पा येथे डॉ. भोबे यांच्या घरात गणपती चित्रशाळा सुरू केली. त्यानंतर त्यांनी वेलोटी येथे घरी मूर्ती चित्रशाळा सुरू केली. आता ते सुमारे २०० गणेशमूर्ती ते बनवतात. प्रभाकर यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय त्यांचे भाऊ कै. यशवंत, अमृत यांचा मुलगा प्रशांत हे करीत आहेत. राजेंद्र हे चांगल्याप्रकारे व्यवसाय पढे नेतात.
मानधनासाठी हेलपाटे नको
प्रभाकर हे फक्त गणपतीच्या मूर्तीच नव्हे तर वास्को येथे होणाऱ्या दामोदर सप्ताहासाठी मूर्ती (पार) बनवतात. गेली सुमारे ७० वर्षांहून अधिक काळ ते त्या सप्ताहासाठी मूर्ती बनवतात. एवढे कष्ट करूनसुद्धा ते म्हणतात की, आम्हाला सरकारकडून मानधन मिळते ते कमी मिळते व वेळेवर मिळत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकार दरबारी पायपीट करावी लागते. तसेच मानधनात वाढ करावी व ते मानधन वेळेवर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.