९ वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू, कुंकळ्ळी परिसरात धक्कादायक घटना
By सूरज.नाईकपवार | Published: April 25, 2024 05:26 PM2024-04-25T17:26:16+5:302024-04-25T17:27:23+5:30
काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मडगाव : ९ वर्षीय मुलगी आपल्या पालकांची नजर चुकवून घराशेजारील कालव्यातील पाण्यात उतरली. यावेळी तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पुर्णिमा अजोय चौधरी असे त्या मुलीचे नाव असून, मुलीचे कुटुंब मूळ पश्चिम बंगालमधील आहे. ती मुलगी विशेष होती. कालव्यातील पाण्यात पडल्यानंतर तिने आरडाआरोडा केला. त्यानंतर तिच्या वडिलाने लगेच तिला पाण्याबाहेर काढले आणि बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतीली फस्ट गेट येथे मुलगी आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. तिला बालपणापासूनच पाण्यात खेळण्याची आवड होती. त्यामुळे ती कालव्यात आपल्या कुटुंबीयांची नजर चुकवून गेली होती. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी नोंद केली आहे. तसेच, पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.