उधळलेल्या बैलाचा ब्रिटिश महिला पर्यटकावर हल्ला; गोव्यातील घटना
By सूरज.नाईकपवार | Published: January 11, 2024 08:52 PM2024-01-11T20:52:57+5:302024-01-11T20:53:25+5:30
माॅरिस या आपल्या अन्य सहकाऱ्यासमवेंत बाणावाली किनाऱ्यावर आल्या होत्या
मडगाव: उधळलेल्या बैलाने हल्ला केल्याने एक ब्रिटीश महिला पर्यटक जखमी होण्याची घटना आज गुरुवारी दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रकिनाऱ्यावर घडली. इव्हाना मॉरिश (७९) असे त्या पर्यटकाचे नाव आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली असता, तिच्यावर हा प्रसंग उदभवला. नंतर तिला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले तेथे तिच्यावर उपचार करुन मागाहून तिला डिसचार्ज देण्यात आला.
माॅरिस या आपल्या अन्य सहकाऱ्यासमवेंत बाणावाली किनाऱ्यावर आल्या होत्या. त्या किनाऱ्यावर फिरत असतानाच अचानक कुत्रे मागे लागल्याने एक बैल उधाळला. आणि जोरात पळत असताना , त्याचे शिंग तिच्या उजव्या पायाला लागले. व या धडकेने ती खाली पडल्याने तिच्या डोक्यालाही मार बसला . इस्पितळात नेल्यानंतर तिच्या पायाला पाच टाके टाकण्यात आले. सुरुवातीला तेथील पर्यटकांनी तिला नजिकच्या शॅक्समध्ये नेउन प्रथोमपचार केला. व नंतर १०८ ॲम्बुलन्स बोलावून तिला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले.