पणजी शहरात मालवाहू ट्रक घुसून झाड माेडले; वाहनांचेही झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 04:49 PM2023-10-22T16:49:02+5:302023-10-22T16:49:16+5:30

ग्नीशमन दलाच्या जवानांनी  घटनास्थळी पाेहचून या झाडाच्या फांद्या कापून रस्ता सुरळीत केला.

A cargo truck entered the city of Panaji and destroyed a tree; Vehicles were also damaged | पणजी शहरात मालवाहू ट्रक घुसून झाड माेडले; वाहनांचेही झाले नुकसान

पणजी शहरात मालवाहू ट्रक घुसून झाड माेडले; वाहनांचेही झाले नुकसान

- नारायण गावस

पणजी: पणजी शहरातील १८ जून  रस्त्यावरील सहकार भंडारजवळ एक मालवाहु ट्रक आत शहरात घुसून  झाडांच्या फांद्या ताेडल्या. या मोठ्या फांद्या रस्त्यावर पार्क केलेल्या  ३ गाड्यावर पडून या गाड्यांचे माेठे नुकसान  झाले आहे. भल्या मोठ्या फांद्या रस्त्यावर पडल्याने रस्ताही ब्लाॅक झाला होता. नंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी  घटनास्थळी पाेहचून या झाडाच्या फांद्या कापून रस्ता सुरळीत केला. या ट्रक चालकाकडून या गड्यांची नुकसान भरपाईची  मागणी केली आहे.

रविवार असल्याने  शहरातील वाहनांची वर्दळ  कमी असते. या संधीचा फायदा घेत माेठा मालवाहू  ट्रक शहरात आतील रस्त्यावर आला होता. हा मालवाहू ट्रक शहरात घुसला पण त्याची उंची जास्त असल्याने  रस्त्याच्या  ाबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्याना धक्का दिल्याने या माेठ्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. तसेच या ट्रकमध्ये एकच चालक  होतो यात वाहक नव्हता. त्यामुळे  चालकाला याचा अंदाज आला नाही. सुदैवाने रस्त्याच्या  ाबाजूला काेणी नव्हते तसेच रविवार असल्याने लोकांची  वर्दळही कमी होती. यामुळे अर्नथ टळल असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पणजी शहरात आतील रस्त्यावर माेठ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. पण आज रविवार असल्याने वाहनांची संख्या कमी असते तसेच काही दुकानांचा माल असतो यामुळे काही वेळा असे मालवाहू ट्रक आत शहरात येतात. पण शहरात रस्त्याच्या बाजुला  मोठी झाडे  आहेत. त्याच्या फांद्या सर्वत्र पसरत असल्याने अशा वाहनांमुळे धोका निर्माण होत असतो.  त्यामुळे पणजी महानगर पालीकेने अशी धोकादायक झाडांच्या फांद्या अगोदरच सुरळीत कराव्या.

Web Title: A cargo truck entered the city of Panaji and destroyed a tree; Vehicles were also damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा