सुनेच्या जाळून मृत्यूप्रकरणात सासूवर गुन्हा दाखल; तीन महिन्यांपूर्वीची घटना

By सूरज.नाईकपवार | Published: December 1, 2023 11:20 AM2023-12-01T11:20:03+5:302023-12-01T11:21:00+5:30

सामंता फर्नांडीस मृत्यू प्रकरण : तीन महिन्यापुर्वी झाला होता मृत्यू : हुंड्यासाठी होत होता छळ

A case has been registered against mother-in-law in the case of daughter-in-law's burning death | सुनेच्या जाळून मृत्यूप्रकरणात सासूवर गुन्हा दाखल; तीन महिन्यांपूर्वीची घटना

सुनेच्या जाळून मृत्यूप्रकरणात सासूवर गुन्हा दाखल; तीन महिन्यांपूर्वीची घटना

सूरज नाईकपवार / मडगाव

मडगाव:  सुनेच्या मृत्यू प्रकरणात सासुवर गुन्हा नोंद झाला आहे. गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे.गवळय नुवे येथील सामंता फर्नांडीस ( ३०) या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात अखेर तीन महिन्यांनी  पोलिसांनी मयताच्या सासुवर हुंंडयासाठी छळ करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणाचा गुन्हा नोंद केला .  पेट्रिसिना फर्नांडीस हिच्याविरोधात पोलिसांनी भादंसंच्या ३०४ (ब) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफ्फुल गिरी पुढील तपास करीत आहेत.क्ररता व हुंडयासाठी छळ करणे व त्यातून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दीली.

सामंता ही जळाल्याने ३० ऑगस्ट रोजी गोमेकॉत तिला मरण आले होते. आपल्या मुलीला तिच्या सासरच्याच लोकांनी जाळून मारल्याचा आरोप मयताची आई मारिया फर्नांडिस हिने केला होता. या प्रकरणात संबधितांवर ४८ तासांच्या आत हुंडयासाठी छळ करणे आणि खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करावा अशी मागणी तिने एका निवेदनाव्दारे दक्षिण गोवा पोलिस अधिक्षकांनाकडेही केली होती.
सामंता हीचा सात वर्षापुर्वी नोएल याच्याशी झाला होता. तीन महिन्यांपुर्वी तिने स्वतला जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचा तिच्या सासरच्या मंडळीने दावा केल होता. तिला चार वर्षांची एक मुलगीही आहे.

सामंता हिने केलेली आत्महत्या नसून, तिला मुद्दामहून जाळून मारण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला होता.संशयितांवर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नसल्याची भुमिका तिच्या आईने घेतल्याने मागचे तीन महिने सामंताचा मृतदेह गोमेकॉच्या शवागारात पडून होता. मडगावच्या उपदंडाधिकऱ्यांनी आपला निवाडा दिल्यानतंर मायणा कुडतरी पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात संशयितावर गुन्हा नोंदवून घेतला.

Web Title: A case has been registered against mother-in-law in the case of daughter-in-law's burning death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.