तिसरीच्या विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद:

By पूजा प्रभूगावकर | Published: November 27, 2023 03:58 PM2023-11-27T15:58:00+5:302023-11-27T15:58:37+5:30

विठ्ठलापूर प्राथमिक शाळेतील प्रकार

A case has been registered by the police against the teacher for beating up the third student Vithalapur primary school incident | तिसरीच्या विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद:

तिसरीच्या विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद:

पणजी: विठ्ठलापूर - साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. डिचोली पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३२३ व बाल हक्क कायद्याच्या ८(२) कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला आहे. दरम्यान सदर घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत ही घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली. संशयित शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याच्या आईला सकाळी फोन करुन तुमचा मुलगा स्वच्छतागृहातून परत येताना भिंतीला आपटला व तो रडत असल्याचा फोन करुन कळवले. दुपारी पीडित मुलगा घरी शाळेतून परतल्यानंतर आईने त्याची चौकशी केली असता त्यांनी आपल्याला शिक्षिकेने कानशिलात लगावली व यात त्याचे डोके भिंतीला आपटले व त्यात जखमी झालो. तसेच स्वच्छतागृहातून परत येत असताना आपण भिंतीला आपटल्याचे शिक्षिकेने सर्वांना खोटे सांगितले असेही मुलाने आपल्या आईला सांगितले.

त्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आईने सदर शिक्षिकेविरोधात या मारहाण प्रकरणी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित शिक्षिकेविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही या तक्रारीत केली आहे.

Web Title: A case has been registered by the police against the teacher for beating up the third student Vithalapur primary school incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा