वीस लाखाच्या तारा चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल; वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गायब
By आप्पा बुवा | Updated: July 11, 2024 18:29 IST2024-07-11T18:21:28+5:302024-07-11T18:29:35+5:30
निघताना गाडीमध्ये 26 टन तांब्याच्या वायर होत्या. सदर ट्रकची तपासणी केली असता वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गडप झाल्याचे आढळून आले.

वीस लाखाच्या तारा चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल; वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गायब
फोंडा - फिनोलॉक्स कंपनी साठी पाठविण्यात आलेल्या तांब्याच्या तारा पैकी सुमारे 20 लाखाच्या तारा गडप केल्याप्रकरणी ड्रायव्हरच्या विरुद्ध फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तानुसार, बीड महाराष्ट्र येथील अशोक हा ड्रायव्हर ट्रक क्रमांक एम एच ०९ एफ एल 75 47 ह्या ट्रकने उजगाव येथील फिनोलेक्स कंपनीकडे निघाला होता. निघताना गाडीमध्ये 26 टन तांब्याच्या वायर होत्या. सदर ट्रकची तपासणी केली असता वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गडप झाल्याचे आढळून आले.
कमी झालेल्या २.६ टन तारांच्या बाबतीत ड्रायव्हरही स्पष्टीकरण देऊ शकला नाही. दिनांक पाच जुलै ते नऊ जुलै च्या दरम्यान चिपळूण ते लांजा ह्या दरम्यान सदर चोरी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ह्या संबंधात सुरेश कुमार शर्मा यांनी फोंडा पोलीस स्थानकात ड्रायव्हरच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फोंडा पोलिसांनी सदर तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे यासंबंधी पुढील तपास करत आहेत.