कारागृहातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला प्रकरण; युगांडातील महिला कैद्यावर गुन्हा दाखल

By काशिराम म्हांबरे | Published: January 27, 2024 02:30 PM2024-01-27T14:30:18+5:302024-01-27T14:30:59+5:30

कारागृहाचे अधिक्षक शंकर गांवकर यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली होती.

A case of assault on prison security guards; A crime against women in Uganda | कारागृहातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला प्रकरण; युगांडातील महिला कैद्यावर गुन्हा दाखल

कारागृहातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला प्रकरण; युगांडातील महिला कैद्यावर गुन्हा दाखल

म्हापसा: काशिराम म्हांबरे 

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातुन पळून जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर कारागृहातील दोघा मेट्रन तसेच सुरक्षा रक्षकावर हल्ला करुन त्यांना मारहाण केल्या प्रकरणी युगांडा देशाची महिला कैदी मिनाफू हफुसा हिच्या विरोधात कोलवाळ पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारागृहाचे अधिक्षक शंकर गांवकर यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली होती.  घटना २३ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न तेथील सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. त्यामुळे संशयिताने मुख्य प्रवेशव्दारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अस्मा खान, जयश्री चोडणकर आणि आशा वेंगुर्लेकर यांचा चावा घेऊन त्यांच्यांवर सेफ्टी  स्टिकनेवार करुन त्यांना जखमी केले होते. त्यात त्यांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सध्या संशयिता विरोधात एका खून करणात म्हापसातील  जलदगती न्यायालयात खटला सुरु आहे. त्यासाठी तिला कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.  तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास कार्य पोलिसांकडून आरंभण्यात आले आहे.

Web Title: A case of assault on prison security guards; A crime against women in Uganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.