गोव्यातील कोलवा मार्गावरील इंधन पंपावर सीएनजी गळतीने उडाली घबराट

By सूरज.नाईकपवार | Published: September 27, 2023 05:11 PM2023-09-27T17:11:32+5:302023-09-27T17:11:59+5:30

या पंपावर सीएनजी गॅस स्टेशनही आहे.

A CNG leak at a fuel pump on Colwa Marg in Goa sparked panic | गोव्यातील कोलवा मार्गावरील इंधन पंपावर सीएनजी गळतीने उडाली घबराट

गोव्यातील कोलवा मार्गावरील इंधन पंपावर सीएनजी गळतीने उडाली घबराट

googlenewsNext

मडगाव: सीएनजी गॅस भरण्यासाठी आणलेल्या सिलिंडरला गळती लागल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. बुधवारी गोव्यातील सासष्टी तालुक्यातील  कोलव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपावर ही घटना घडली. या पंपावर सीएनजी गॅस स्टेशनही आहे.

कंपनीचे अधिकारी व मडगाव अग्निशमनदलच्या जवानांनी त्वरीत सिलिंडर भरलेलेला ट्रक पेट्रोल पंपावरुन दूर नेला व गॅस बाहेर सोडून सिलिंडर रिकामे केल्याने पुढील अनर्थ टळला. कोलवा कडे जाणाऱ्या इंडियन ऑईलच्या मनोरा पेट्रोलपंपवर बुधवारी सकाळी ९.५५ वाजता ही घटना घडली. पंपावरील सीएनजी स्टेशनसाठी गॅस भरणा करण्यासाठी सिलिंडर गॅस्केट ट्रकमधून आणले होते. त्यातील एका वाहिनीतून गॅस गळती होउ लागली व मोठया प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या इंंडियन ऑइल अदानी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना या गॅस गळतीबाबत माहिती देण्यात आल्यावर अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. मडगाव अग्निशामक दलही घटनास्थळी पाेहचले.

दलाचे अधिकारी गील सोझाा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस स्टेशनवर सीएनजी भरणा करण्यासाठी आणलेल्या वाहनातील मुख्य वाहिनीच्या जोडणीतून गॅस गळती असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणाहून होणारी गॅस गळती बंद करता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रक नंतर पेट्रेलपंपावरुन दूर रस्त्याशेजारी आणण्यात आला. व मागाहून सिलिंडरमधील गॅस एका ठराविक वेगाने सोडून देत सिलिंडर रिक्त करण्यात आले.

कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दररोज सिलिंडरची तपासणी केली जाते. ट्रकमधील सिलिंडरच्या वाहिन्यांना किंवा व्हॉलमधून गळती होउ शकते. छोटया गॅस स्टेशनवर ट्रकमधून सिलिंडर नेउन गॅस पुरवठा केला जाउ शकतो. बुधवारी जी गॅस गळती झाली ती तशी मोठी नव्हती , असे इंडियन ऑईल अदाने गॅसचे उपव्यवस्थापक सचिन हिंदलकर म्हणाले.

Web Title: A CNG leak at a fuel pump on Colwa Marg in Goa sparked panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.