पर्वरीतील भीषण अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:57 PM2024-01-16T14:57:07+5:302024-01-16T15:01:35+5:30

मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

A disabled person died in a terrible accident | पर्वरीतील भीषण अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू 

पर्वरीतील भीषण अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू 

शेखर वायंगणकर -

पर्वरी : पर्वरी महामार्गावरील डेल्फिनो सुपरमार्केट समोर नशेत असलेल्या थार जीप चालकाने स्कुटरला जोरदार धडक दिल्याने दिव्यांग व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. कित्तू बेहरा (५१,म्हापसा) असे या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. 

पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मंगळावरी (दि.१६) पहाटे पाच वाजता पणजीमार्गे जाणाऱ्या थार जीपने (जीए-०३ झेड-६१८८) डेल्फिनो सुपरमार्केटसमोर एका स्कुटरला (जीए-०३,एसी-८८२९) मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील दिव्यांग कित्तू बेहरा (५१,म्हापसा) जागीच 
ठार झाले. जीप चालक नरेश जैन (४१, रा. वसई-महाराष्ट्र) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठविले असता त्याने मद्यपान केले असल्याचे आढळले. सहायक उपनिरीक्षक संजीव साळुंके यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहेत. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर  अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघात वाढले आहेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 

 

Web Title: A disabled person died in a terrible accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.