उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग

By सूरज.नाईकपवार | Published: August 19, 2023 10:59 AM2023-08-19T10:59:01+5:302023-08-19T10:59:35+5:30

संशयिताने तिला टीर्शट काढण्यास सांगून तिच्या अंगाला हात लावण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या त्या युवतीने नंतर पोलिस ठाण्यात येउन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदविली.

A doctor molested a young woman who came for treatment at the clinic goa crime news; An incident that blackened the medical field | उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग

उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग

googlenewsNext

मडगाव: वैदयकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक घटना  गोव्यातील मडगाव येथे घडली असून, तपासणीसाठी क्लिनिकमध्ये आलेल्या एका सव्वीस वर्षीय युवतीचा डॉक्टरनेविनयभंग केला. डॉ. प्रकाश अवदी (७७) असे संशयित डॉक्टराचे नाव असून, आपली नात शोभणाऱ्या त्या युवतीवर त्याने आगळिक करण्याचे पापकृत्य केले.

या प्रकरणात पिडिताने मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भारतीय दंड संहितेंच्या ३५४ (अ) कलमाखाली पाेलिसांनी संशयित डॉक्टरावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुढील तपास चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. अवदी यांंचे मडगावात क्लिनीक आहे. बुधवार दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनउच्या सुमारास ती युवती ताप आल्याने डॉक्टराकडे तपासणीसाठी गेली होती.यावेळी संशयिताने तिला टीर्शट काढण्यास सांगून तिच्या अंगाला हात लावण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या त्या युवतीने नंतर पोलिस ठाण्यात येउन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदविली.

Web Title: A doctor molested a young woman who came for treatment at the clinic goa crime news; An incident that blackened the medical field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.