हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
By काशिराम म्हांबरे | Published: April 26, 2024 02:08 PM2024-04-26T14:08:11+5:302024-04-26T14:11:05+5:30
हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली.
काशिराम म्हांबरे , म्हापसा : हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील कपड्या समवेत तेथे पार्क करुन ठेवण्यात आलेली एक दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाली असून नुकसानीचा अंदाज लागला नव्हता. तसेच आग लागण्याचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाहीत.
पिळर्ण येथील अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घटना आज शुक्रवारी पहाटे ४ च्या दरम्यान आग लागण्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पण तोपर्यंत आग सर्वत्र पसरून दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाले होते. दलाचे उपअधिकारी रामा नाईक तसेच त्याच्या पथकाने तातडीने हालचाली सुमारे एक तासाच्या मेहनतीनंतर करून आगीवर नियंत्रण मिळवले. दुकानाच्या मूळ मालकाने आपले दुकान भाडेपट्टीवर दिले आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज लागू शकला नाही.