भरदिवसा घर फोडले: सुवर्णलंकार व रोकड मिळून १ लाख ७५ हजारांचा ऐवज पळविला
By सूरज.नाईकपवार | Published: February 10, 2024 11:58 AM2024-02-10T11:58:12+5:302024-02-10T11:58:48+5:30
भांदंसच्या ३८० व ४५४ कलमाखाली मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
मडगाव: सकाळी घरातील मंडळी कामासाठी बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटयांनी दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील फस्टपाली दिकरपाली येथील घरात चोरी करुन सोन्याचे दागिने व रोकड मिळून १ लाख ७५ हजारांचा ऐवज लुटला. भरदिवसा ही घटना घडल्याने येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
भांदंसच्या ३८० व ४५४ कलमाखाली मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.शांती कांबळे या तक्रारदार आहेत. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या दरम्यान चोरीची वरील घटना घडली. संशयिताने तक्रारदाराच्या घराचे मागील बाजूचा दरवाजा फोडून आत शिरुन चोरी केली. दोन सोन्याच्या बांगडया, एक सोनसाखळी व पाच हजार रुपये पळविले. चोरीची घटना मागाहून उघडकीस आल्यानंतर कांबळी यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचानामा केला. दरम्यान चोऱ्याच्या घटनेत वाढ होत असून, पोलिस गस्त वाढविण्याची गरज या भागात होत आहे.