१९ वर्षीय युवकाच्या बॅगेतून सापडला एक कीलो गांजा
By पंकज शेट्ये | Published: March 30, 2024 05:00 PM2024-03-30T17:00:59+5:302024-03-30T17:01:14+5:30
वास्कोतील जोशी चौक परिसरात संशयास्पद फीरणाऱ्या १९ वर्षीय सुयश अंबरनाथ याला एक कीलो गांजासहीत रंगेहात पकडल्यानंतर वास्को पोलीसांनी त्याला अटक केली.
वास्को: हातात बॅग घेऊन एक युवक संशयास्पद फीरताना गस्तीवर असलेल्या पोलीसांना दिसून येताच त्याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेतून पोलीसांना एक कीलो गांजा अमली पदार्थ आढळला. वास्कोतील जोशी चौक परिसरात संशयास्पद फीरणाऱ्या १९ वर्षीय सुयश अंबरनाथ याला एक कीलो गांजासहीत रंगेहात पकडल्यानंतर वास्को पोलीसांनी त्याला अटक केली.
वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.२९) उशिरा रात्री त्याबाबत कारवाई करण्यात आली. वास्को पोलीसांचे शिपाई - अधिकारी गस्तीवर असताना त्यांना जोशी चौक जवळ एक युवक संशयास्पद फिरताना आढळून आला. पोलीसांनी त्याला अडवून प्रश्न विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्या युवकाबाबत पोलीसांना आणखीन संशय निर्माण झाला. पोलीसांनी युवकाशी असलेल्या बॅगची झडती घेतली असता बॅगेत एक कीलो गांजा असल्याचे उघड झाले. त्या युवकाकडून गांजा अमली पदार्थ आढळल्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याशी कसून चौकशीला सुरवात केली असता त्याचे नाव सुयश अंबरनाथ असल्याचे उघड झाले. गांजासहीत पकडलेला सुयश बिजापूर, कर्नाटक येथील असल्याची माहीती उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी सांगितले. जप्त केलेल्या गांजाची कींमत एक लाख रुपये असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. सुयश याला तो गांजा कोणी दिला होता, आणि तो गांजा सुयश कोणाला विकण्यासाठी घेऊन आला होता का त्याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत.