बिबट्याचे २० मीटर उंचीच्या माडावर ठाण; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 06:51 PM2023-05-14T18:51:05+5:302023-05-14T18:51:13+5:30

गीतेश वेरेकर सावईवेरे :     भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथील कुळण वाड्यावर भरवस्तीत शिरकाव करून ...

A leopard nests on a hill 20 meters high; An atmosphere of fear among the villagers | बिबट्याचे २० मीटर उंचीच्या माडावर ठाण; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याचे २० मीटर उंचीच्या माडावर ठाण; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

googlenewsNext

गीतेश वेरेकर
सावईवेरे :
    भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथील कुळण वाड्यावर भरवस्तीत शिरकाव करून सुमारे २० मीटर उंच माडावर ठाण मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
     कुळणवाडा हा कुळागरी भाग असल्याने येथे नसौर्गिक जलस्रोत आहेत. या वाड्याच्या मागील बाजूला रान असल्याने काल शनिवारी रात्रीच्या वेळी रानातून भुकेने व्याकुळ अथवा पाण्याच्या शोधात बिबट्या या वाड्यात शिरला असावा. परंतु  कुत्र्यांच्या भुंकण्याने किंवा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिथरलेल्या बिबट्याने कुळण येथील अशोक सावईकर यांच्या घराशेजारील माडाचा आधार घेतला असावा. सकाळी ८ च्या सुमारास घरमालक बाहेर येताच त्यांच्या घराशेजारीच नारळ पडल्याचे त्यांना दिसले.त्यांनी सहज माडावर नजर टाकताच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले व या कुटुंबातील सर्व मंडळींची तसेच आजूबाजूच्या घरातील मंडळींची घाबरगुंडी उडाली. याबाबतची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी फोंड्याचे वन क्षेत्रपाल अधिकारी ( RFO) दीपक तांडेल यांनी माहिती देताना सांगितले की बिबट्या सुमारे दोन ते तीन वर्षांचा असून उंचावर असल्याने नर की मादी कळणे कठीण आहे. त्याला खाली आणणे शक्य नसल्याने हा बिबट्या आपोआप खाली येईपर्यंत वाट बघण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. तरीही त्याला खाली आणण्यासाठी आमचे सहकारी प्रयत्नशील आहेत. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
     बिबट्याचे दर्शन घेण्यासाठी व त्याचा फोटो  मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बघ्यांची बरीच गर्दी जमली.सोशल मीडियावर बिबट्याचा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाला. संध्याकाळी उशिरा ५ वाजेपर्यंत  या बिबट्याने खाली उतरण्याचे कोणतेही धाडस केले नाही.पहिल्यांदाच या भागात बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.या बिबट्याला माडावरून उतरवणार तरी कसे ? याचीच वाट स्थानिक लोक बघत आहेत.कदाचित रात्रीच्या वेळी खाली उतरेल असा अंदाज वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

Web Title: A leopard nests on a hill 20 meters high; An atmosphere of fear among the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.