‘आंबट शौक’ भोवले, १.३५ कोटीचा फटका
By पंकज शेट्ये | Published: March 29, 2024 05:42 PM2024-03-29T17:42:45+5:302024-03-29T17:46:39+5:30
एका इसमाला त्याचा ‘अश्लील व्हीडीयो’ व्हायरल करण्याची धमकी देत १ कोटी ३५ लाखांना लुभाडण्याचा प्रकार उघडकीस आला.
पंकज शेट्ये,वास्को: विदेशी जहाजावर काम करणाऱ्या आरोपी गावातील एका इसमाला त्याचा ‘अश्लील व्हिडियो’ व्हायरल करण्याची धमकी देत १ कोटी ३५ लाखांना लुभाडण्याचा प्रकार उघडकीस आला. काही वर्षापूर्वी ऑनलाईन ‘डेटींग ॲप’ द्वारे त्या इसमाची एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर तरुणीने इसमाचा नग्न व्हिडियो रिर्कोड करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. व्हिडियो व्हायरल न व्हावा यासाठी धमकी देणाऱ्यांना अनेकवेळा विविध बॅंक खात्यात इसमाने पैसे घातले असून त्याला एकूण १ कोटी ३५ लाखांना लुबाडल्याचे त्याच्या तक्रारीतून उघड झाले. वेर्णा पोलिसांनी इसमाची तक्रार नोंद करून त्या प्रकरणात शंकर जाधव याच्यासहीत अन्य दोन तरुणींवर गुन्हा नोंद केल्याची माहिती प्राप्त झाली.
वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोसी गावात राहणाऱ्या एका इसमाला धमकी देत १ कोटी ३५ लाखांना लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले. तो इसम विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला असून २०२० पासून त्याला धमकी देत लुबाडण्यात येत आहे.
काही वर्षापूर्वी त्या इसमाची ऑनलाईन ‘डेटींग ॲप’ वर एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर तरुणीने ‘डेटींग ॲप’ वरून इसमाचा नग्न व्हीडीयो रिर्कोड करून त्याला तो व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरवात केली. तसेच व्हिडियो व्हायरल करायचा नसल्यास पैसे देण्याची मागणी तरुणीने इसमाशी करायला सुरवात केली. व्हीडीयो व्हायरल न व्हावा यासाठी इसमाने तरुणीकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार पैसे देण्यास सुरवात केली. ती तरुणी ज्या ज्या वेळी पैशांची मागणी करायची त्या त्या वेळी तिने सांगितलेल्या वेगवेगळ्या बॅंक खात्यात इसमाने पैसे घातल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली. व्हीडीयो व्हायरल न व्हावा यासाठी इसमाने अनेकवेळा तरुणीने सांगितलेल्या प्रमाणे विविध बॅंक खात्यात पैसे घातले असून त्याला १ कोटी ३५ लाखांना लुबाडण्यात आल्याची माहीती मिळाली.
ऑनलाईन ‘डेटींग ॲप’ वर तरुणीशी ओळख होऊन नंतर स्वत:ची झालेल्या १ कोटी ३५ लाखांच्या लुटीची तक्रार अखेरीस इसमाने वेर्णा पोलीस स्थानकावर दिली. धमकी देत पैशांची लूट केलेल्या प्रकरणात इसमाने दोन तरुणींच्या नावासहीत शंकर जाधव नामक इसमाचे नाव दिले असून तिघेहीजण कर्नाटक येथील असल्याचे पोलिसांना कळविले. वेर्णा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. इसमाने दिलेली ती नावे खरी आहेत की त्याची लुट करण्यासाठी आरोपींनी खोट्या नावांचा वापर केला होता त्याबाबत आणि त्या प्रकरणातील इतर विषयात सुद्धा वेर्णा पोलीस चौकशी करीत आहेत.