मडगावात शुक्रवारी रात्री ओल्ड मार्केटमध्ये गोळीबार करणारा गजाआड
By सूरज.नाईकपवार | Published: October 20, 2023 12:03 PM2023-10-20T12:03:04+5:302023-10-20T12:03:45+5:30
डिपोझीट म्हणून ठेवलेले दोन लाख रुपये परत दया असे सांगितल्याने त्या दुकानवाल्याला धमकाविण्यास त्याने गोळीबार केला असे तपासात उघड झाले आहे.
मडगाव: गोव्यातील मडगाव शहरातील ओल्ड मार्केट येथे शुक्रवारी रात्री गोळीबार करणारा रसेल डिसोझा याच्या हाती पाेलिसांनी बेडया ठोकल्या आहे. राज्यात साजरा झालेल्या कार्निव्हल महोत्सवात तो किंग मोमो होता. सदया तो गजाआड झाला आहे. डिपोझीट म्हणून ठेवलेले दोन लाख रुपये परत दया असे सांगितल्याने त्या दुकानवाल्याला धमकाविण्यास त्याने गोळीबार केला असे तपासात उघड झाले आहे.
संशयिताला फातोर्डा पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली. त्याच्याविरोधात भादंसंच्या ३०७ व शस्त्रात कायदयाअतंर्गंत गुन्हा नोंद केला असल्याची माहिती फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली. शुक्रवारी रात्री येथील ओल्ड मार्केटमधील लोकांनी गोळीबाराचा थरार अनुभवला. गोळीबार केल्यानंतर रसेल स्वतहून फातोर्डा पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री पावणे दहाच्या सुमारास वरील घटना घडली. हशमत उल्ला हे तक्रारदार आहेत. संशयित डिसोझा याचे ओल्ड मार्केटमध्ये दुकान असून, त्याने ते भाडेपट्टीवर हशमत याला चालविण्यास दिले होते.
या दुकानासंबधी करार संपल्याने डिपोझीट म्हणून दिलेले २ लाख रुपये परत करण्याची मागणी केली असता, चिडावलेल्या डिसोझा याने गोळीबार केला. संशयित आपल्याकडे पिस्तुलचा परवाना असल्याचे सांगत असला तरी अजूनही त्याने पाेलिसांना हा परवाना दाखविला नाही. उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.