गोव्यात बस प्रवासात महिला प्रवाशाची लगट करण्याचा प्रयत्न एकाला भोवला
By सूरज.नाईकपवार | Updated: May 20, 2024 17:06 IST2024-05-20T17:04:29+5:302024-05-20T17:06:33+5:30
बस प्रवासात एका महिला प्रवाशाची लगट करुन तीचा विनयभंग करण्याची एक घटना गोव्यातील फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मागाहून पीडिताने पोलिसांत तक्रार नोंदविली.

गोव्यात बस प्रवासात महिला प्रवाशाची लगट करण्याचा प्रयत्न एकाला भोवला
मडगाव : बस प्रवासात एका महिला प्रवाशाची लगट करुन तीचा विनयभंग करण्याची एक घटना गोव्यातील फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मागाहून पीडिताने पोलिसांत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी मोहिद्दीन कासिमसाब मुल्ला (४२) याला अटक केली आहे. तो देउळमळ केपे येथील रहिवाशी आहे.भादंसंच्या ३५४ (ड) व ३२३ कलमाखाली त्याच्याविरोधात फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयेशा खेडेकर या पुढील तपास करीत आहेत.
पीडित एका खाजगी बसमधून प्रवास करीत होती. त्यावेळी संशयिताने वरील आगळीक केली. त्या पिडिताने त्याला विरोध केला असता, तिला मारहाणही करण्यात आली. नंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचले. त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संबधितांनी आपल्या तपासकामाला सुरुवात केली व संशयिताला गजाआड केले.