अल्पवयिनावर अत्याचार प्रकरणी एकाला अटक
By काशिराम म्हांबरे | Published: July 14, 2023 09:19 PM2023-07-14T21:19:27+5:302023-07-14T21:19:55+5:30
संशयिताची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
काशीराम म्हांबरे / म्हापसा:एका अल्पवयिन मुलीचे अपहरण करुन नंतर तिच्या लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपा प्रकरणी म्हापसा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कर्नाटकातून एकाला अटक केली आहे.
उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मोहम्मद राजाबल्ली ( वय २३ रा. बेती, मूळ कर्नाटक ) या युवकाला अटक केली आहे. तसेच त्या पिडीत मुलीची त्याच्या तावडीतू न सुटका करण्यात आली आहे. १० जुलैरोजी म्हापसा येथील कदंब बस स्थानकावरून आपल्या १६ वर्षीय अल्पवयिन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी एका महिलेने येथील पोलीस स्थानकावर अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. केलेली तक्रार भादंसंच्या कलम ३६३ तसेच गोवा बाल अधिनियम कायद्याचे कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला होता.
तपासा दरम्यान वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आलेली. या पथकाला त्यांच्या शोधासाठी कर्नाटकातील बेळगावी तसेच दावणगिरी येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने संशयिताच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला दावणगिरी येथून अटक केली. तसेच त्या मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली.
त्या पिडीत मुलीची वैद्यकिय तपासणी करुन तिचा जबाब नोंदवण्यात आला आणि नोंद केलेल्या गुन्ह्यात पोक्सो कायद्याचा समावेश करण्यात आला. संशयिताची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक ऋचा भोंसले, उपनिरीक्षक गौरव नाईक, उपनिरीक्षक विराज कोरगांवकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्राजक्ता झाल्बा यांनी तपास कार्यात सहकार्य केले.
फोटो: लैंगीक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिता समवेत म्हापसा पोलीस.