दुचाकी अपघातात पोलीस शिपायाचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

By पंकज शेट्ये | Published: June 26, 2023 05:20 PM2023-06-26T17:20:37+5:302023-06-26T17:20:53+5:30

नितेशवर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मुरगाव पोलीसांनी दिली.

A police constable died in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात पोलीस शिपायाचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

दुचाकी अपघातात पोलीस शिपायाचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

वास्को : रविवारी (दि.२५) उशिरा रात्री जेटी, सडा येथे दोन दुचाकीत समोरा समोरून झालेल्या अपघातात जखमी झालेला पोलीस शिपाई नितेश कळंगुटकर (वय ४३) याचा इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला. रोहीतकुमार बिंद नामक इसमाने दुचाकीवरून जाताना पुढे असलेल्या एका वाहनाला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला असता तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोचून त्याने समोरून येणाऱ्या नितेश कळंगुटकर ह्या पोलीस शिपायाच्या दुचाकीला जबर धडक दिली.

अपघातानंतर जखमी झालेल्या नितेश आणि रोहीतकुमार यांना १०८ रुग्णवाहीकेने उपचारासाठी त्वरित बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेले, मात्र मध्यरात्रीनंतर १२.३० च्या सुमारास नितेशवर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मुरगाव पोलीसांनी दिली.

मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास तो अपघात घडला. सडा येथे राहणारा नितेश कळंगुटकर हा पोलीस शिपाई सद्या पणजी येथे ‘सेक्युरीटी युनिट’ मध्ये ड्युटीसाठी नियुक्त होता. रविवारी रात्री तो आपल्या दुचाकीवरून (क्र: जीए ०६ एसी ११५१) वास्कोहून सडाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी रोहीतकुमार बिंद नामक इसम दुचाकीवरून (क्र: जीए ०६ बी ६१४७) सडाहून वास्कोच्या दिशेने जात होता. रोहीतकुमार दुचाकीवरून जाताना त्यांने समोर असलेल्या एका वाहनाला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला. ‘ओव्हरटेक’ करण्याच्या नादात रोहीतकुमार याची दुचाकी रस्त्याच्या दुसºया बाजूने पोचून त्याच्या दुचाकीने जाऊन पुढच्या बाजूने येणाऱ्या नितेश कळंगुटकर याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्या अपघातात दोघेहीजण जखमी झाल्यानंतर १०८ रुग्णवाहीकेने घटनास्थळावर पोचून दोघांनाही उपचारासाठी त्वरित बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेले. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रोहीतकुमार बिंद यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक असल्याने त्याला घरी पाठवले. त्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या नितेश कळंगुटकर याच्यावर इस्पितळात उपचार चालू असताना मध्यरात्रीनंतर १२.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.

नितेश कळंगुटकर याचे असे अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटूंबावर दुख्:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच नितेशच्या अपघाती निधनाची माहीती नातेवाईक - मित्रमंडळीत पोचताच त्यांनाही एके प्रकारचा धक्का बसला. पोलीस शिपाई नितेश कळंगुटकर यांना अनेकजण ‘सरपंच’ अशा नावाने बोलवायचे. नितेश कळंगुटकर सद्या पणजी येथे ‘सेक्युरीटी युनिट’ मध्ये ड्युटीवर नियुक्त होता. यापूर्वी त्यांने पोलीस शिपाई म्हणून वास्को वाहतूक विभागात, वास्को सीआयडी विभागात, मंत्र्याचा पीएसओ आणि कुकळी पोलीस स्थानकावर सेवा बजावलेली आहे. नितेश कळंगुटकर याच्या पच्छात त्याची आई, पत्नी, एक मुलगा - एक मुलगी, भाव - बहीण इत्यादी असा मोठा कुटूंब आहे. सोमवारी (दि.२६) नितेशच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात दिला. मुरगाव पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे.

Web Title: A police constable died in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.